“मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना” रावेर तालुक्यातील ४३ हजार ४४७ अर्ज मंजूर
रावेर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. या योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेसाठी महिला अर्ज दाखल करीत आहेत.त्या नुसार जळगाव जिल्ह्यातील रावेर अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जोमात सुरू आहे. दाखल अर्जांपैकी शासनाने तालुक्यातील ४३ हजार ४४७ अर्ज ऑनलाइन मंजूर केले आहेत.
रावेर तालुक्यातील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी अर्जांची मंजुरीची प्रक्रिया मोठ्या जलदगतीने सुरू आहे.आतापर्यंत ४६ हजार ४२५ महिलांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर केले असून त्या पैकी शासनाने तालुक्यातील ४३ हजार ४४७ अर्ज ऑनलाइन मंजूर केले असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी दिली.
छाननी प्रक्रियेत ४६ हजार ४२५ आर्जांपैकी ४३ हजार ४४७ अर्ज ऑनलाइन मंजूर करण्यात आले असून २ हजार ९४५ अर्जांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळून आल्या आहेत व फक्त २६ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
ही प्रक्रिया राबविण्यासाठी तहसीलदार बंडु कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी महसूल प्रशासन, बिडीओ दिपाली कोतवाल, रावेर नगर पालिका मुख्याधिकारी स्वालिया मालगावे, सावदा नगर पालिका मुख्याधिकारी भूषण वर्मा, आणि एकात्मिक बाल विकास अधिकारी शहरी व ग्रामीण यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.