आ.चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातुन मुक्ताईनगर,बोदवड व सावदा येथील विकास कामांसाठी १० कोटी रु.निधीस मंजुरी
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज-अक्षय काठोके : मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील मराठा समाजाला दिलेल्या वचनांची पूर्ती करत आमदार चंद्रकांत पाटील यांनी दोघेही ठिकाणी शहरात प्रत्येकी ७० लक्ष रू. भरीव निधीसह भव्य छञपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह मंजूर करून आणले असून नुकतेच आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केल्यानुसार मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विशेष सूचनेनुसार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सदरील कामांना मंजुरी देत मुक्ताईनगर , बोदवड व सावदा येथील विविध पायाभूत व विकास कामांना भरीव निधीच्या तरतुदी सह मंजुरी दिली असून मतदार संघातील एकूण १० कोटी च्या विकास कामांना मंजुरी मिळाली असून दि. ८ जून २०२२ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. अशी माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी “मंडे टू मंडे न्युजच्या” प्रतिनिधीला दिली.
खामखेडा पुलावर आत्महत्यांचे प्रमाण खूप वाढले असल्याने आमदार पाटील यांनी या ठिकाणी जातीने लक्ष देवून येथे संरक्षण जाळी उभारणी करणे या कामास सुमारे ६० लक्ष निधीसह मंजुरी मिळविल्याने या ठिकाणी लवकरच गणपती उत्सव व दुर्गोत्सव विसर्जन उपाय योजना करून संरक्षण जाळी उभारण्यात येईल.” “सावदा येथील सोमेश्वर नगर मधील रहिवाशी तसेच शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनधी यांच्या मागणीनुसार येथे सुमारे २५५ लक्ष निधी व चौक सुशोभीकरण साठी १५ लक्ष असे एकूण २ कोटी ७० ची भरीव तरतूद करून या परिसरात डांबरीकरण व मजबुतीकरण कामांसाठी देखील मंजुरी मिळविली आहे”.
खालील प्रमाणे नमूद कामांना निधी सह मंजुरी मिळाली :
मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.१२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे. ता.मुक्ताईनगर (७० लक्ष) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत भवानी माता मंदिराजवळ सुशोभिकरण करणे व पेव्हर ब्लॉक बसविणे . ता.मुक्ताईनगर (२०लक्ष.) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.१५ मध्ये खुली जागा (Open space Develope) विकसित करणे ता.मुक्ताईनगर (५० लक्ष.), मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील आस्था नगरी ते संत मुक्ताई मंदिराकडे जाणारा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता.मुक्ताईनगर (४० लक्ष.)
मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.१ मधील बालाजी टॉकीज ते हनुमान मंदिर पर्यंत आर सी सी गटार बांधकाम करणे.(१५ लक्ष.), मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.२ मधील भवानी मंदिरामागील जुन्या कब्रस्थान मागे रस्ता कॉंक्रीटीकरण करणे.(१५ लक्ष.) नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.३ मधील अकबर शहा ते जनार्दन बोदडे व कडू चांभार ते उर्दू शाळेपर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे.(१५ लक्ष.) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.४ मधील अयुब पिंजारी ते मुजाहिद ड्रायव्हर यांचे घरापर्यंत आर सी सी गटार बांधकाम करणे.(१५ लक्ष.), मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.६ मध्ये मुक्ताई झेरॉक्स आस्था नगरीच्या नाल्यापर्यंत गटार बांधकाम करणे.(१५ लक्ष.) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.७ मधील काठोके यांचे दुकानापासून ते संजू काळे यांच्या घरापर्यंत व दामू धनगर यांचे घरासमोरून ते हनुमान मंदिरापर्यंत व सुनील केशव भालेराव यांच्या घरासमोरून ते सचिन सुरवाडे यांच्या घरापर्यंत आर सी सी गटार बांधकाम करणे.(१५ लक्ष.), मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.१२ मध्ये पर्यंत आर सी सी गटार बांधकाम करणे.(१५ लक्ष.)
मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र१४ मध्ये आर सी सी गटार बांधकाम करणे.(१५ लक्ष.), मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.१५ मधील खिरळकर अप्पा ते डी.जी.पाटील व जोगी साहेब ते मितेश ढेले व चिमकर गुरुजी ते समर्थ हॉल पर्यंत दुतर्फा आर सी सी गटार बांधकाम करणे.(१५ लक्ष.), मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.१७ मध्ये आर सी सी गटार बांधकाम करणे. (१५ लक्ष.), मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.१२ मध्ये उद्यानाचे विस्तारीकरण करणे ता.मुक्ताईनगर (२० लक्ष), मुक्ताईनगर येथे नगरपंचायत हद्दीत पूर्णा नदी पुलावर संरक्षण जाळी बांधकाम करणे .ता.मुक्ताईनगर (६० लक्ष),
बोदवड नगरपंचायत हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे. ता.मुक्ताईनगर
(७० लक्ष), बोदवड नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.१ मधील भिल्ल वस्तीमध्ये गल्ली बोळात पेव्हर ब्लॉक बसविणे व आर सी सी गटार बांधकाम करणे.(१७ लक्ष.), बोदवड नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.१ मधील ग्रामीण रुग्णालयापासून ते वराडे यांच्या घरापर्यंत ते सत्य नारायण शर्मा यांच्या घरापर्यंत ते किशोर तायडे यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा आर सी सी गटार बांधकाम करणे व रस्ता कॉंक्रीटीकरण करणे.(१७ लक्ष.), बोदवड नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.६ मधील महाकाल चौक ते जवरी मेलांडे ते सुरज सारवान यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे.(१७ लक्ष.)
बोदवड नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.९ मधील जामठी रोडवरील स्मशानभूमी जवळील मेंबर कॉलनीत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे.(३२ लक्ष.), बोदवड नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.१६ मधील युसुफ ठेकेदार यांच्या घरापासून ते जीवन माळी यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे.(१७ लक्ष.) बोदवड नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र.१७ मधील शफी मिजवान ते नुरा मण्यार यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे.(१७ लक्ष.), बोदवड नगरपंचायत हद्दीत मोहन कोल्हे ते रामधन पारधी यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे व आर सी सी गटार बांधकाम करणे.(३३ लक्ष.) बोदवड नगरपंचायत हद्दीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ सुशोभिकरण करणे.(३० लक्ष.), बोदवड नगरपंचायत हद्दीत शिवद्वाराजवळ सुशोभिकरण करणे.(२० लक्ष.), बोदवड नगरपंचायत हद्दीत अमर हॉटेल ते मलकापूर कडे जाणाऱ्या रस्त्याचे दुभाजाकासह सुशोभिकरण करणे व पथदिवे उभारणे.ता.बोदवड (५० लक्ष), सावदा नगर परिषद हद्दीत विविध ठिकाणी चौक सुशोभिकरण करणे. (१५ लक्ष), सावदा नगरपरिषद हद्दीत सोमेश्वर नगरमध्ये विविध ठिकाणी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता.मुक्ताईनगर (२५५ लक्ष)
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा