लाभार्थ्यांना वंचित ठेवले प्रकरणी तहसीलदारावर कारवाई करावी– आ चंद्रकांत पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : आर्थिक दुर्बल घटकातील घरकुल लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी ५ ब्रास वाळू गौण खनिज स्वामित्व धन न आकारता देण्याची शासनाचे परिपत्रक असूनही वारंवार लेखी पत्रव्यवहार तसेच सूचना देऊन देखील शासन निर्णयाला केराची टोपली दाखवून मुक्ताईनगर तहसीलदार या सदरील घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित करीत असल्याने घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ ५ ब्रास वाळू चे स्वामित्व धन न करण्याचे व तात्काळ परवाना देण्याच्या सूचनेचे लेखी पत्र तहसीलदार, मुक्ताईनगर यांना देत तहसीलदार यांनी शासनाच्या आदेशाची अंबलबजावणी न होता यातून आदेशाची पायमल्ली करून आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वंचित ठेवले प्रकरणी त्यांना नोटीस का बजावण्यात येवू नये व याप्रकरणी दखल घेवून योग्य कारवाई तात्काळ करावी अशा आशयाचे पत्र आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दिले आहे.
- 20 टक्के राजकारण 80 टक्के समाजकारण आणि विकास हेच माझे व्हिजन : अमोल जावळे
- पत्रकार संघटनेचा मोठा निर्णय : सर्व राजकीय पक्षांच्या बातम्यांवर बहिष्कार, राजकीय वर्तुळात खळबळ
- महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांना धनगर समाजाचा जाहिर पाठींबा
त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, माझ्या मतदार संघातील मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेतून लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले आहेत. सन २०१९ पासून अ.ब यादीतील काहींची घरकुल योजनेतील मंजूर घरे पूर्णत्वास आली तर सद्य स्थितीत नुकतीच ड यादीतील पात्र लाभार्थ्यांची घरकुल बांधकामे वाळू अभावी रखडलेली आहेत. परंतु शासन परिपत्रक क्रमांक गौखनि १०/०११९/प्र.क्र.५/ ख-२ मंत्रालय मुंबई दि. १२/०२/२०१९ चे परिपत्रक नुसार शासन अधिसूचना क्रमांक गौखनि १०/०२१५/प्र.क्र.१२/ख, दि. १७.११.२०१८ अन्वये आर्थिक दुर्बल घटकातील प्रत्येकी घरकुल लाभार्थ्यास ५ ब्रास वाळू साठी स्मामित्व धन न आकारता परवानगी देण्याची तरतूद आहे. यासाठी म. मुक्ताईनगर तहसिलदार यांचेकडे अनेकवेळा लेखी पत्रव्यवहार व सूचना देवून देखील त्यांचे मार्फत अद्याप पावेतो कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
यामुळे शासनाच्या धोरणांची पायमल्ली होत सदरील लाभार्थ्यांना याबाबतीत वंचित ठेवले जात असून मुक्ताईनगर तालुक्यातील हजारो घरकुल लाभार्थ्यांची घरकुल बांधकामे रखडलेली आहेत. तर पूर्वी बांधकामे झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना वाळू बाबतीत स्वामित्व धनाचा नाहक भुर्दंड बसलेला आहे. अशा आशयाच्या अनेक तक्रारी व निवेदने मला प्राप्त झालेलेले आहे. तसेच आज पावेतो सदरील शासन निर्णयाची अंबल बजावणी आज पावेतो न होता शासन निर्णयाची पायमल्ली करून आर्थिक दुर्बल घटकातील घरकुल लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात आलेले आहे. याप्रकरणी तात्काळ सखोल चौकशी होत म. तहसिलदार मुक्ताईनगर यांनी कर्तव्यात कसूर केले प्रकरणी त्यांना नोटीस का बजावण्यात येवू नये. या प्रकरणाची दखल घेवून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.असे पत्रात त्यानी नमूद केले आहे.