मुक्ताईनगर कृषी उत्पन्न बाजार समिती गाळे बांधकाम प्रक्रियेबाबत तक्रारी : कारवाईची मागणी !
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीची उपशाखा असलेल्या मुक्ताईनगर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत ई टेंडर होण्याआधी याठिकाणी गाळे बांधकाम पूर्ण होण्याच्या मार्गावर असतांना नंतर मंजुरी व टेंडर तसेच परवानग्या घेतल्या जात असल्याच्या तक्रारी केल्या जात असून यामुळे समितीच्या अजब गजब कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात असल्याने याची वरिष्ठ पातळीवरून तसेच स्थानिक आमदार व खासदार यांनी लक्ष देत चौकशी करून कारवाईची करण्याची मागणी करण्यात येत आहे.
बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीची उपशाखा मुक्ताईनगर कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून असल्याने या ठिकाणी गेल्या वर्ष झाले गाळे बांधकामाचे काम सुरू आहे पहिल्या टप्प्यात गाडे बांधकामाची निविदा दैनिकात प्रसिद्ध करण्यात आली तीही पाच गाडे बांधकामाची परंतु अस्तित्वात मात्र दुमजली करून दहा गाळे बांधण्यात आले रंगरंगोटी करून शटर लावून काम पूर्ण झाले तसेच त्याचं ठिकाणी दुसऱ्या बाजूला आता अकरा गाळे बांधकाम सुरू आहे व तेही आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत परंतु या समितीमधील सदस्य तसेच अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार यानिमित्ताने चर्चेचा विषय बनला आहे. ई टेंडर ची जाहिरात दिवशी प्रसिद्ध झाली तसेच 14 ऑगस्ट 2021 रोजी या टेंडरची अनामत रक्कम भरण्यात आली परंतु त्याआधीच ठेकेदार शोधून त्याला काम दिले जाते व त्याचे ठेकेदाराकडून लिंटर लेव्हल बांधकाम पूर्ण केले जाते कोणाच्या आदेशाने होते हे तपासणे मात्र गरजेचे आहे. तसेच बांधकाम होत असलेल्या गाड्यांची परवानगी व जाहीर झालेली निविदा मात्र पाचच गाड्यांची असताना सदर ठिकाणी मात्र 11 गाळे बांधकाम व त्यांना उघड्या डोळ्यांनी दिसत आहे कोणाच्या सहर्ष आशीर्वादाने एवढा भोंगळ कारभार सुरू आहे असा ही प्रश्न होत आहे. याप्रकरणी माहिती अधिकारात माहिती मागवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती उप मुक्ताईनगर रोड या ठिकाणी पहिल्या टप्प्यात घेण्यात आलेल्या गाळे बांधकाम परवानगी पाच गाड्यांची परंतु त्याच ठिकाणी दुमजली बांधून दहा गाळे बांधण्यात आल्याची दिसत असून तशी ओरड होत आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात मागणी करण्यात आलेली पाच गाळे बांधकाम चे तसेच या ठिकाणीदेखील ११ गाळे बांधकाम सुरू आहे दोन्ही टप्प्यातील बांधकाम हे एकाच ठेकेदाराकडून करत असल्याचे माहिती यावेळी मिळाली परंतु नगरपंचायत तर्फे घेण्यात आलेल्या परवानगीच मात्र दुमजली चा उल्लेख नसून दोन्ही साईड ने ५ आणि दहा पंधरा गाड्या बांधकामाची परवानगी दिली असल्याने हा भोंगळ कारभार सर्वांच्या निदर्शनास असून मोठ्या आर्थिक व्यवहाराने तर अधिकाऱ्यांची खिसे गरम झाले नाही ना असे परिसरातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहे
गोरगरीब नागरिकाला जर बांधकाम झालेले असले किंवा करावयाचे असले तर नगरपंचायत नानाप्रकारच्या दाखले व उतारे मागते तसेच बांधकाम सुरू केले तर त्यावर गुन्हा दाखल करून जास्तीचा कर भरावयाचे लावते परंतु या ठिकाणी नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी यांना माहिती असताना देखील परवानगी मागण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये गोड तर नाही ना असे न पाहता परवानगी दिली तेही एक मजली परंतु बांधकामाच्या ठिकाणी झालेले बांधकाम दुमजली पूर्णत्वास होण्याच्या मार्गावर असून डोळेझाक का काही आर्थिक व्यवहार तर झालेला नाही ना असे संतापजनक प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे