लोहरखेडा येथिल बेपत्ता झालेल्या अजयचा रोहिणी खडसेच्या मदतीने असा लागला शोध !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : तालुक्यातील लोहरखेडा येथील अजय संजय माळी हा युवक दि 10 जुन रोजी घरातून अचानक बेपत्ता झाला होता त्याच्या कुटुंबियांनी जवळपास आणि नातेवाईकांकडे शोधाशोध करून त्याचा पत्ता लागत नसल्याने त्याचे कुटुंबीय चिंतेत होते त्यामुळे माळी कुटुंबीयांनी दि 12 जुन रोजी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अजय माळी हरवल्याची तक्रार दिली परंतु अजय चा शोध घेण्यास अडचणी येत होत्या त्यामुळे माळी परिवाराने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पवनराजे पाटील यांना घटनेची माहिती दिली.
- मुक्ताईनगर मतदारसंघातील निराशाजनक चित्र बदलवण्यासाठी रोहिणी खडसेंना निवडून द्या– शरद पवार
- ब्रेकिंग : विनोद सोनवणे गोळीबार प्रकरणात तीन संशयित ताब्यात; दोन फरार !
- मुक्ताईनगरात निवडणूकीची माहिती न देण्याऱ्या प्रशासनाच्या विरोधात पत्रकारांचा बहिष्कार
यावेळी पाटील यांनी लागलीच माळी कुटुंबियांना घेऊन महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांना भेट घेत सर्व हकीकत सांगितली यानंतर सौ. खडसे खेवलकर यांनी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्याशी संपर्क साधून सदर कुटुंबियांची घालमेल बघून तत्काळ शोध घेण्या संबंधी व मोबाईलचा सिडीआर लोकेशन घेण्याबाबत विनंती केली. यावर पीआय शेळके यांनी रविवारी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून सि डी आर लोकेशन व इतर तांत्रिक बाबींची माहिती घेतली त्यानुसार अजय माळी हा नागपूर मध्ये असल्याचे आढळून आले.
यामुळे पीआय शेळके यांनी नागपूर मधील स्थानिक पोलीस स्टेशन सोबत संपर्क साधून या घटनेची माहिती दिली माळी कुटुंबीय आणि निमखेडी येथील संदिप पाटोळे हे नागपूरला गेले दि 13 रोजी नागपूर येथे स्थानिक पोलिस आणि माळी कुटुंबियांना अक्षय एका तृतीय पंथीयांच्या वसाहतीत आढळून आला तपासा अंती बऱ्हाणपूर येथील एक तृतीयपंथी अजय ला नागपूर येथे घेऊन गेल्याचे आढळून आले. रोहिणी खडसे खेवलकर, पवनराजे पाटील, पोलीस निरीक्षक शेळके साहेब व स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने अजय माळी हा सुखरूप लोहरखेडा येथे घरी पोहचला याबद्दल माळी कुटुंबियांनी या सर्वांचे आभार व्यक्त केले