भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

महाविकास आघाडीतर्फे पुकारलेल्या बंदला मुक्ताईनगरात संमिश्र प्रतिसाद !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन :

मुक्ताईनगर, प्रतिनिधी : ‘उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांना वाहनाने चिरडून टाकण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती त्यास मुक्ताईनगर शहरवासीयांनी पूर्णपणे काळकळीत बंद करून साद दिली खरी मात्र, दुपारी १२: ३० नंतर काहींनी दुकाने सुरू केली त्यामुळे महाराष्ट्र बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसते.

शहरात व्यापाऱ्यांनी दुपारी साडेबारा पर्यंत कडकडीत बंद पाळून लोकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला जीवनावश्यक सुविधांना बंदतून वगळण्यात आले होते. लखीमपूरची घटना जलियानवाला बाग हत्याकांडासारखी आहे.असे काँग्रेसचे जेष्ठ नेते एस इ भोई यांनी म्हटले आहे. मुक्ताईनगर मध्ये शेतकऱ्यांची हत्या घडवून आणणाऱ्या पक्षाला बंदद्वारे चोख उत्तर दिले ,लखीमपूरची घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. भाजपकडून मारेकऱ्यांचा बचाव करण्याचा घृणास्पद प्रकार सुरू आहे. याचा निषेध म्हणून काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी परिवर्तन चौकामध्ये केंद्र सरकार विरोधात घोषणा दिल्या, शहरामध्ये बंद मध्ये मुक्ताईनगर विधानसभा आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती दिली

याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष एस ए भोई सर, जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष दिनेश पाटील,तालुका उपाध्यक्ष अँड.राहुल पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजू माळी, काँग्रेस शहराध्यक्ष प्रा.पवन खुरपडे ,माजी तालुकाध्यक्ष अँड.अरविंद गोसावी, मागासवर्गीय जिल्हा उपाध्यक्ष बी.डी गवई, अ.जा.तालुकाध्यक्ष निलेश भालेराव ,प्रा.सुभास पाटील,नामदेव भोई,तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र जाधव,निखिल चौधरी,राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष बापू ससाणे,संजय कोळी,राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सोपान दुट्टे,राजू वानखेडे, यासिन खान, रवींद्र महाजन, शहर उपाध्यक्ष आरिफ रब्बानी,शिवाजी पाटील,संजय धामोळे,अनिल सोनवणे, रवी जयकर ,वसीम मान्सुरी, आनंदा कोळी,पवन कांडेलकर,आदी महाविकास आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!