हलखेड्याच्या जंगलात ५० हजाराच्या खंडणीसाठी मारहाण; तीन जंणावर गुन्हा !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील हलखेडा येथे राहिवासास असलेल्या मध्यप्रदेशातील तरूणाला ५० हजार रुपये खंडणीसाठी भल्या पहाटे मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असून या प्रकरणी तीन जणांनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातील छिंडवाडा जिल्ह्यातील अमरवाडा येथील रहिवासी असणारा अमित हरीश बसकार या तरुणांस बुधवारी मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे सकाळी ६ वाजेच्या सुमारास चापटा बुक्यांनी व लाथानी मारण्यास लागले मारहाण करतांना म्हणाले तुला मार व जीव वाचवायचा असेल तर ५० हजार रुपये दे नाही तर तुला मारून टाकू अशी धमकी दिला आशू पावरा याने फिर्यादीच्या खिशातून ३००० रुपये काढले व बरसेन भोसले यांनी मोबाईल हिसकावून घेत फिर्यादिस जंगलात सोडून आले.
या प्रकरणी बरसेन भोसले, नानसिंग पावरा आणि आशू पावरा या तिघांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.