भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

राष्ट्रीय कुटूंब अर्थ साहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना आ. पाटील यांच्या हस्ते धनादेश वाटप

Monday To Monday NewsNetwork।

मुक्ताईनगर प्रतिनिधी (अक्षय काठोके )। आज मुक्ताईनगर येथे उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण कल्याण समितीची मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, आरोग्याच्या विविध सोयी सुविधांविषयी,आवश्यक अधिकारी- कर्मचारी भरती, रुग्णालयातील स्वच्छता आदी विषयांवर चर्चा करण्यात आली, प्रसंगी तहसीलदार श्वेता संचेती, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. जयकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे, समितीचे सदस्य श्री. प्रफुल्ल पाटील, श्री. प्रशांत (गणेश) टोंगे, शिवसेना तालुका प्रमुख श्री. छोटुभाऊ भोई, नगरसेवक पियुष महाजन, मुकेश वानखेडे, गटनेता राजू हिवराळे आदी उपस्थित होते.
तसेच आज मुक्ताईनगर तहसिल कार्यालयात मतदारसंघातील राष्ट्रीय कुटूंब अर्थ साहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले , प्रसंगी तहसीलदार श्वेता संचेती, पोलीस निरीक्षक श्री. रामकृष्ण पवार , जिल्हा काँग्रेस सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते श्री. अनंतराव देशमुख, शिवसेना तालुका प्रमुख छोटुभाऊ भोई आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!