भाजपा मुक्ताईनगर तर्फे तृणमूल कॉंग्रेस पुरस्कृत हिंसाचाराचा तीव्र निषेध,खा.खडसेंच्या हस्ते तहसीलदाराना निवेदन
Monday To Monday NewsNetwork।
मुक्ताईनगर प्रतिनिधी (अक्षय काठोके)। पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून भाजपा कार्यकर्ते तसेच भाजपा समर्थकांच्या हत्या, जिवघेणे हल्ले तसेच स्त्रियांवर सामूहिक बलात्काराचे सत्र सुरू आहे. तृणमूल कॉंग्रेस पुरस्कृत या हिंसाचाराचा भाजपा मुक्ताईनगर तर्फे तीव्र निषेध कारण्यात येऊन खासदार रक्षाताई खडसेंच्या हस्ते तहसीलदार मुक्ताईनगर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, माजी जि.प.अध्यक्ष अशोक कांडेलकर, तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, जि.प.सभापती जयपाल बोदडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, नगरसेवक ललित महाजन, नगरसेवक पियुष महाजन, नगरसेवक मुकेश वानखेडे, प.स.सदस्य राजेंद्र सवळे, विनोद पाटील, विजय काठोके, सौरव पाटील इ. पाधाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.