ना. गिरीश महाजनाच्या ‘’त्या ‘’ व्यक्तव्याने मुक्ताईनगर भाजप कार्यकर्त्यांना मिळाले बळ, कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्याचे वातावरण
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी | राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्व पक्षाचे कार्यकर्ते आप आपल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नेहमीच हॉट झोन असलेल्या मुक्ताईनगरकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. ऐन न तेन कारणाने चर्चेत असलेल्या मुक्ताईनगरात कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे डोळे खिळून आहेत. येथे भाजप व शिवसेना हे दोघ पक्ष स्वतंत्र लढत असल्याने येथिल राजकीय वातावरणत गरम हवा जोमात सुरू आहे. अशात राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगर नगरपंचायतीवर स्पष्ट बहुमताने भाजपला एकहाती विजय मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त केल्याने भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ना. महाजनानी मुक्ताईनगरचा गड पुन्हा काबीज करणार असल्याचे स्पष्ट केले.
गेल्या बुधवारी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगर नगरपंचायतीवर स्पष्ट बहुमताने भाजपला एकहाती विजय मिळणार असल्याचा सांगत ना. महाजनानी मुक्ताईनगरचा गड पुन्हा काबीज करणार असल्याचे स्पष्ट केले. स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद आणि एकूण परिस्थितीचा अंदाज घेतल्यावर, भाजप स्वबळावर सहज जिंकू शकते, “स्थानिक परिस्थिती बघता आम्ही युतीचा प्रस्ताव नाकारला आणि स्वबळावर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.” आणि भाजप येथे नगराध्यक्षपदासह सर्व जागा जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावत असून नगरपंचायतीवर स्पष्ट बहुमताने भाजपला विजय मिळणार असल्याचा सांगत ना. महाजनानी मुक्ताईनगरचा गड पुन्हा काबीज करणार असल्याचे स्पष्ट केले.
महाजनांच्या या उद्गारानी भाजप कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत असून कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मंत्री महाजनांच्या आशावादाने केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याची चर्चा संपूर्ण मुक्ताईनगर शहरात ऐकायला मिळत आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नगरध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना ललित महाजन यांनी होम टू होम प्रचाराचा झंजावात सुरू केला असून भाजप कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे व ना. गिरीश महाजन यांच्या मुक्ताईनगर नगरपंचायतवर एकहाती विजय मिळवण्याचा आशावाद कार्यकर्त्याना बूस्टर डोस देणारा ठरत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाच्याशीर्ष नेतृत्वाने मोठी ताकद लावली असून मागील काही वर्ष वगळता मुक्ताईनगर नेहमी भाजपचा बाले किल्ला राहीला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी आपली ताकद पणाला लागली असून मुक्ताईनगरचा गड पुन्हा काबीज करणार असल्याचे स्पष्ट संकेत ना. महाजनांनी दिले आणि भाजपचे उमेदवार भावना ललित महाजन आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांनी अक्षरशः पायाला फिंगरी बांधली आहे. जोरदार प्रचार उमेदवारांनी सुरू केला आहे. येथे मुख्य लढत भाजप आणि शिवसेना यांच्यात होत असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने जेष्ठ नेते पूर्वा श्रमीचे भाजप मंत्री एकनाथराव खडसे यांच्या रूपाने मुक्ताईनगर भाजपचा बाले किल्ला राहीला आहे परंतु आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने येथे उमेदवार दिलेले नाही. त्यामुळे भाजप आपली संपूर्ण ताकद पणाला लावत असून त्याच पार्शवभूमीवर ना. गिरीश महाजन यांच्या मुक्ताईनगर नगरपंचायतवर एकहाती विजय मिळवण्याचा आशावाद कार्यकर्त्याना बूस्टर डोस देणारा ठरत असून कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.


