ज्याचा बाप मास्तर असून हजार १२०० कोटींची संपत्ती कशी ?- एकनाथ खडसेचा सवाल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे वृत्तसेवा : आमच्याकडे आधीपासून घरे होती वाडे होती. मात्र ज्याचा बाप मास्तर होता त्याने हजार बाराशे कोटी रूपयांची प्रॉपर्टी कशी जमवली ? असा गंभीर आरोप करत खडसेंनी नाव न घेता आ. गिरीश महाजनांना लक्ष केलं आहे. ते पुढे म्हणाले, बीएचआरचा घोटाळा आवाज उठवल्याने आपल्यामागे ईडीची चौकशी लावण्यात आल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बोदवड येथील बैठकीत भाष्य केले.
याबाबत अधिक असे, बोदवड येथे आज शुक्रवारी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी एका कार्यक्रमात बोलतांना म्हणाले, आपण कधीही भाड्याच्या घरात राहणारे नव्हतो. माझे बापजादे श्रीमंत होते. त्यांची घरे, शेतजमीन आणि वाडे होते. तसे आधीपासूनचे उतारे सुद्धा आहेत. मात्र ज्याचे बाप ज्याचा बाप मास्तर होता त्याची प्रापर्टी हजार बाराशे करोड कशी ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत नाव न घेता आ. गिरीश महाजनांना लक्ष केलं. खडसे पुढे म्हणाले, मला माहिती आहे बेनामी किती आहे मी लहान सांगत नाही हा आकडा अजून मोठा असून खरे दुखणे हे बीएचआरमध्ये असून त्यामुळे आपल्यावर ईडीची कारवाई करण्यात आल्याचा आरोप खडसेंनी केला. ज्याप्रमाणे एखाद्या पोपटाचा जीव हा पिंजऱ्यात असतो ना तसा ज्यांच्या मध्ये जीव होता ते मध्ये आहे. त्यामुळे त्यांचा जीव हा बीएचआरमध्ये असल्याचे म्हटले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून एकनाथराव खडसे यांच्यावर ईडीने कारवाई केल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली होती त्यांना नोटीस बजावण्यात आल्याचेही बोललेले जात होतं मात्र, याप्रकरणात जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी याबाबत भाष्य करत यासर्व अफवा असल्याचे मंडे टू मंडे शी बोलतांना सांगितलं होते. तसेच नाथाभाऊं कामानिमित्त बाहेर असून दोन दिवसात नाथाभाऊ सर्वांशी संवाद साधतील असेही त्यांनी म्हटले होते. त्यानुसार आज नाथाभाऊ यांनी बोदवड येथील कार्यक्रमाला हजेरी लावत ईडीच्या कारवाईबाबत भाष्य केले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे, तालुकाध्यक्ष डॉ. पाटील व कार्यकर्ते उपस्थिती होते.