भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमबोदवळमुक्ताईनगर

बोदवड नगरपंचायत तोडफोड प्रकरण भोवले; राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर/प्रतिनिधी: बोदवड नगरपंचायतीच्या कार्यालयात शहरातील मंजूर २ करोड ४० लाख रुपयांच्या स्मशानभूमी सुशोभीकरणाच्या कामावरुन नगरसेवकांत संघर्ष निर्माण होऊन वाद निर्माण झाला होता. या वादातून राष्ट्रवादीचे गटनेते तथा नगरसेवक देवेंद्र खेवलकर यांनी मुख्याधिकार्यांच्या दालनाचे प्रवेशद्वाराच्या काचेची तोडफोड केली होती. या प्रकरणी राष्ट्रवादीचे गटनेते तथा नगरसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्यादीत नमुद सविस्तर वृत्त असे कि, दिनांक 12/05/2021 रोजी नगरपंचायत कार्यालयातील मुख्याधिकार्यांच्या दालनात वाद निर्माण झाला होता. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. यांत राष्ट्रवादीचे गटनेते तथा नगरसेवक देवेंद्र खेवलकर यांनी नगरपंचायत कार्यालयातील मुख्याधिर्यांच्या दालनातील प्रवेशद्वाराचे जोराने हात मारुन काच तोडून नुकसान करत सुमारे 2000 रुपयाचे नुकसान केले आहे. मुख्याधिकारी श्री. चंद्रकांत भोसले यांनी ऊपस्थित नगरसेवकांना नोटीस बजावली होती. सदरील नोटीसचे असमाधानकार ऊत्तर आल्याने नगरपंचायतीचे कार्यालयीन अधिक्षक राजुसिंग चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन नगरपंचायत अभियंते रितेश बच्छाव, कर्मचारी आनंदा वराडे व नितिन मराठे यांची साक्ष नोंदवत राष्ट्रवादीचे गटनेते तथा नगरसेवक देवेंद्र खेवलकर यांच्यावर भारतीय दंड संहिता 427 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!