मुक्ताईनगर/बोदवड तालुका व शहर काँग्रेस कमिटी आढावा बैठक संपन्न….
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज.प्रतिनिधी | आज दि.10/4/25 रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या आदेशाने माननीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रात काँग्रेसच्या संघटनात्मक व जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांच्या जबाबदाऱ्या आणि अधिकार यांचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी आज जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक श्याम भाऊ उमाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आढाव बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रामपंचायत निवडणुका संदर्भात व पक्षीय संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली व प्रत्येकाचे मते जाणून घेतले.
याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील,जिल्हा सेक्रेटरी जमील शेख, माजी शहराध्यक्ष सलीम पटेल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य डॉ जगदीश पाटील, ॲड अरविंद गोसावी, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, एस ए भोईसर, जिल्हा सरचिटणीस संजयभाऊ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, गुलाबराव जी महाराज, बोदवड तालुकाध्यक्ष भारत पाटील, बाळू भाऊ पाटील येवती, दिलीप भाऊ पाटील नाळगाव, विनोद मायकर बोदवड, विजय पाटील बोदवड, बाबुराव बडे बोदवड, नाना पाटील,सागर पाटील बोदवड, युवक प्रदेश सरचिटणीस आशुतोष पवार, महिला तालुकाध्यक्ष सौ मनीषा कांडेलकर, बाळू पाटील, बी.डी. गवई साहेब, राजेंद्र जाधव, बाळूभाऊ कांडेलकर, अशोक भाऊ डीवरे, सुनील भाऊ भंगाळे निमखेडी, निखिल चौधरी, आरिफ रब्बानी, शिवाजी पाटील, पुंडलिक भाऊ धायले, सलीम मंत्री,नामदेवराव भोई, अमोल पाटील कुऱ्हा, रामदास श्री नामे, मनोज पाटील, दिलीप उन्हाळे, आनंदराव कोळी, तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.