माहिती अधिकारात माहिती देण्यास चांगदेव ग्रामसेवकाकडून टाळाटाळ : माहिती अधिकारात भ्रष्टाचाराचे बिंग फुटणार ! गटविकास अधिकाऱ्यांचा आदेश पायदळी : गटविकास अधिकारी झाले हतबल, मुजोरीचा नवा अध्याय ! माहिती अधिकारात मोठा गैरव्यवहार उघड होणार !
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : येथील तक्रारदार यांनी दि.10 जून 2021 रोजी चांगदेव येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती अधिकार अर्ज दाखल करून 1) ग्रामपंचाय तिने सन 2018-2021 या वर्षात केलेली विकास कामे व केंद्र व राज्य सरकारचा या विकास कामांसाठी कुठल्या योजनेतून किती निधी उपलब्ध झाला. 2)ग्रामपंचायतीच्या मागील पाच वर्षांच्या सन 2016-2021 ऑडिट रिपोर्टनुची छायांकित प्रत मिळावी अश्या माहिती मागितली होती परंतु चांगदेव येथील ग्रामसेवक रामकृष्ण चौधरी यांनी सदर तक्रारदारास आपण मागितलेली माहिती प्रश्नार्थक स्वरूपाची आहे असे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ करत वेळ मारून नेली विशेष म्हणजे ग्रामसेवक रामकृष्ण चौधरी यांना रिटायरमेंट कालावधी 6 महिन्यांन वर येऊन ठेपला असून त्यामुळे आपलं कोण काय वाकड करून घेईल या गुर्मीत राहून वेळ मारून देण्याचे काम त्यांच्या कडुन करण्यात येत आहे. तसेच सदरील अर्ज सुध्दा निकाली काढला होता. या माहिती अधिकारात मागवल्या माहितीत मोठा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येणार असल्याने माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. ग्रामसेव रामकृष्ण चौधरी यांचा कारभार म्हणजे “अपना काम बनता खड्डे मे जाये जनता” या स्वरुपाचा अनागोंदी माजविणारा व मनमानी कारभार असल्याचे दिसून येत असून त्यांना कार्यालयीन वेळेत नागरिकांचे कामे करण्यासाठी उपस्थित राहणे बंधनकारक नाही का ? असे काही विशेष अधिकार यांना मिळाले आहेत का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे ?
या अर्जावर तक्रारदाराने संबंधित गट विकास अधिकारी यांच्याकडे प्रथम अपील दाखल केले होते त्या अनुषंगाने अपिलावर वर 23 जुलै 2021 रोजी गटविकास अधिकारी यांच्या दालनात सुनावणी होऊन सदर तक्रारदारास माहिती देण्याचा आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेला होता सदर ग्रामविकास अधिकाऱ्यास 23 जुलै 2021रोजी तक्रारदारास सात दिवसाच्या आत माहिती देण्यात यावी असा आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेला होता. तरी या आदेशाला आज दोन महिनेचा कालावधी उलटून सुद्धा कुठल्याही प्रकारची माहिती ग्रामसेवकाकडून तक्रारदारास देण्यात आलेली नाही. या माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीत मोठा गैरव्यवहार चव्हाट्यावर येणार असून ग्रामसेवकांचे भ्रष्टाचाराचे मोठे बिंग फुटणार असल्याने अनेक जण गोत्यात सापडणार असून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे शासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. तरी यामागे नक्की गौडबंगाल आहे तरी काय ?असा प्रश्न पडला असून या मुजोर ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी अक्षय काठोके यांनी केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी पंकज आशिया या प्रकरणात लक्ष घालून कारवाई करतील का ? तसेच वरिष्ठ अधिकारी ग्रामसेवक यांचेपुढे हतबल झाले असून कारवाई करणार तरी कशी? असेही नागरिकांमध्ये बोलले जात असून जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांची याप्रकरणात चुप्पी संशयास्पद असल्याचेही दिसून येत आहे.
सदरील ग्रामसेवकाने ८ ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कर्तव्य बाजावण्यास हजर राहणे शासन नियमानुसार बंधनकारक असताना चांगदेव येथील ग्रामसेवक रामकृष्ण चौधरी हे मात्र दुपारी १२ वाजेला ग्रामपंचायत मधून निघून जातात त्यामुळे चांगदेव गावातील ग्रामस्थ विकासापासून लांब आहेत तसेच शासन नियमाप्रमाणे ग्रामसेवक ड्युटी करत असलेल्या गावी रूम घेऊन राहणे बंधनकारक असताना सदर ग्रामसेवक बाहेरगावाहून ये-जा करतात तसेच फोन लावल्यावर अरेरावीची भाषा करतात. यांचा कारभार म्हणजे “अपना काम बनता भाड मे जाये जनता” या स्वरुपाचा अनागोंदी माजविणारा व मनमानी कारभार असल्याचे दिसून येत असून त्यांना कार्यालयीन वेळेत नागरिकांचे कामे करण्यासाठी उपस्थित राहणे बंधनकारक नाही का ? असे काही विशेष अधिकार यांना मिळाले आहेत का ? की वरीष्ठही हतबल झाले आहेत असा प्रश्न नागरिकांना पडला आहे ?
वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली केल्याने जिल्ह्यात निलंबनाची एक कारवाई- तशीच या प्रकरणात होईल का ?
भडगाव पंचायत समिती येथे कार्यरत शाखा अभियंता एन.व्ही. आखाडे यांना पाचोरा पंचायत समिती येथे कार्यरत असताना विविध कर्तव्ये बजावत असताना वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या आदेशावर मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशियाना यांची स्वाक्षरी असून सदर आदेश भडगाव पंचायत समितीला प्राप्त झाला आहे. याप्रकरणात जशी तत्परता दाखवत कारवाई करण्यात आली तशी कारवाई चांगदेव ग्रामसेवक रामकृष्ण चौधरी यांच्या कार्यालयीन गावी न राहणे व वरिष्ठांच्या आदेश पायदळी तुळवणे व माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ करणे अश्या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी करती की शेवटी त्यांच्यापुढे हतबलता पत्करली जाईल याकडे आता तालुक्यातील नागरिकांच्या नजरा लागून आहे.