भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीयरावेर

राजकारणाच्या सारीपाठावर डाव टाकण्यास सुरुवात, मुक्ताईनगर मतदारसंघ भाजपचाच ! खडसेंच्या डावाकडे लक्ष !

सावदा/मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज चमू |  राज्यात विधानसभेसाठी आचार संहिता जाहीर झाली आहे. अशातच जळगांव जिल्ह्यातील महत्वाचा असलेला मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ पारंपरिक भाजपचा राहिला आहे यामुळें मतदारसंघावर पुन्हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दावा केला आहे. येथून मतदरसंघातील सध्याचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिंदेंना पाठींबा दिला आहे. परंतु ते अपक्ष व राष्ट्रवादी पुरस्कृत लढल्याने ते युतीचे घटक होवू शकत नाही असा सूर लावत महायुतीच्या या राजकारणात ही जागा आमचीच असल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा बैठकांमद्ये घेतलेल्या ठाम भूमिकेने मुक्ताईनगर मतदासंघातून राजकारणातील सारीपाठावर फासे टाकण्यात सुरवात झाली आहे.

राज्यांत भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी महायुती तीन पक्ष असल्याने जेथे विद्यमान आमदार आहेत ती जागा त्या पक्षाला सोडणार असे सूत्र ठरले असले तरी यात मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात भाकरी फिरणार असल्याचे पक्षित वर्तुळात चर्चिले जात असून महायुतीच्या निर्णयानुसार मुक्ताईनगरची जागा भारतीय जनता पक्षाची असून ती जागा लढण्यावर कुठल्याही परिस्थितीत भाजपा ठाम आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या संपूर्ण मतदासंघांत निरीक्षकांकडून बैठका घेण्यात आल्या या बैठकांमध्ये विद्यमान अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्यास आपण काम करणारं नाही त्याच्याकडून भाजप कार्यकर्त्यांना दुजाभावाची वागणूक दिली जाते व ते गेल्या वेळी राष्ट्रवादी पुरस्कृत म्हणून विजयी झाले होते असा सूर लावत भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी निरीक्षकांच्या झालेल्या बैठकांमधे भूमिका मांडली आहे. यामुळें मुक्ताईनगर मतदासंघातून नेहमीच भाजपच उमेदवारी करत आला असल्याने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आल्याची माहिती खात्री लायक सूत्रांनी दिली आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांचा म्हणणे आहे, गेली अनेक वर्षे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ युतीच्या जागा वाटपातही भारतीय जनता पक्षाकडे आहे. येथे भाजपाचा आमदार राहिला आहे. सन 2019 मध्येही भाजपाने निवडणूक लढविली होता मात्र त्यात त्यावेळी पक्षातर्गत राजकारणाचा कुरघोडीमुळे यश आले नाही. अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील हे यात विजयी झाल्याने त्यांनी शिवसेनेला पाठींबा दिला होता. मुक्ताईनगर मतदासंघातून विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील गेल्या निवडणूकीत अपक्ष उमेदवारी दाखल करत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत म्हणुन निवडणुक लढवत भाजपच्या उमेदवार असलेल्या ॲड. रोहिणी खडसे यांचा निसटत्या मतांनी पराभव केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून येथे भाजपाचे वर्चस्व राहिले आहे आणि युतीत ठरल्याप्रमाणे भाजपचा जागा असल्याने ती भाजपच लढणार आहे. या मतावर भाजप ठाम असल्याने ही जागा भाजपाने लढविली तर विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील युतीचे काम करतात की पुन्हा अपक्ष उमेदवारी करतात ? ते काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष राहणार आहे.

तर दुसरीकडे मुररबी राजकारणी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे खुद् मैदानात नसले, तरी मैदान मारण्याची कला त्यांना आहे. खडसेंच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे यांनी यंदा मैदान मारण्यासाठी फुल तयारीत उतरल्या आहेत. भाजपकडे रोहिणी खडसेंना तोडीस तोड असा टक्कर देणारा प्रभावी असा चेहरा नाही. भाजपच्या नेतृत्वाने राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांचाशी गेल्या काही काळात संपर्क साधला होता अशी माहिती खात्री लायक अंतर्गत गोटातून मिळत आहे. त्यामुळे नाथाभाऊ राजकीय सारीपाठावर भुमिका महत्वाची असून ते काय डाव टाकतात यावरही बरीच राजकीय गणित जुळणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!