खा.रक्षा खडसे यांच्याकडून मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक औषधे वाटप
Monday To Monday NewsNetwork।
मुक्ताईनगर प्रतिनिधी (अक्षय काठोके)। कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथिल कोविड रुग्णांसाठी अत्यावश्यक औषधी खासदार रक्षाताई खडसें कडून स्वखर्चाने पुरविण्यात आली, तसेच खासदार रक्षाताई खडसेंनी कोविड सेंटर मधील रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून उपलब्ध सुविधा व समस्यांची तसेच ऑक्सिजन सुविधेची माहिती घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश राणे यांना योग्यत्या सूचना केल्या.
यावेळी तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाने, तालुका उपाध्यक्ष मोहन महाजन, भाजयुमो विधानसभा क्षेत्र प्रमुख दत्ता पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, नगरसेवक ललित महाजन, नगरसेवक पियुष महाजन, नगरसेवक मुकेश वानखेडे, प.स.सदस्य राजेंद्र सवळे, विनोद पाटील, सचिन पाटील, पवन पाटील ई. कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.