मुक्ताईनगरला चोरीचा नवा फंडा ! किराणामाल गाडीत टाकून एकाने परस्पर केले पलायन
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : भाचीचे लग्न असल्याचे सांगत किराणा माल घेत तो गाडीत ठेवून एकाने चक्क पलायन करून दुकानदाराला सुमारे ४३ हजारांना गंडा घातल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली असून चोरीचा नवीन फंडा सुरू झाल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिक वृत्त असे की, मुक्ताईनगर येथील पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या एका किराणा दुकान वर भाचीचे लग्न असून मेव्हणे एसटी संपात असल्याने किराण्याची यादी देऊन माल मोजून घेतला आणि तो गाडीत ठेवून एकाने चक्क पलायन करून दुकानदाराला सुमारे ४३ हजारांना गंडा घातल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली दरम्यान चोरीचा नवीन फंडा सुरू झाल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
शहरातील तहसील रोड वर संतोष रघुनाथ सापधरे यांचे श्री गजानन प्रोविजन नावाने मोठे होलसेल किराणा दुकान आहे मंगळवारी दुपारी हे दुकानात बसलेले असताना एक व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या कारमधून आली व स्वतःचे नाव जाधव असल्याचे सांगून भाचीचे लग्न आहे जिजाजी मात्र एसटी संपात असल्याने त्यांनी मला किराणा घ्यायला पाठवले असून रोख खरेदी करावयाची असल्याने मालाचे भाव व्यवस्थित लावा असे सांगून मालाची यादी दिली
तसेच लवकर साहित्य काढण्याच्या सूचनाही केली त्यानुसार संतोष सापधरे व त्यांचे लहान भाऊ भावेश सापधरे यांनी तातडीने सर्व साहित्य यादीनुसार काढून नीट पॅकिंग करून दिली त्या व्यक्तीच्या सूचनेनुसार सर्व माल कार मध्ये ठेवला ती व्यक्ती लगेच दुकानात येऊन बिल अदा करेल ह्या अंदाजाने सापधरे दुकानात शिरताच त्या व्यक्तीने गाडी वळवून घेतो असे सांगून भरधाव गाडी चालवत पळून गेला दुकान मालक यांना काही कळेल त्याच्या आत या भामट्याने पोबारा केला संतोष सापधरे यांनी गाडीचा दुचाकीने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु भामटा पलायनसह दुकानदाराला सुमारे ४३ हजारांना चुना लावण्यात यशस्वी झाला
पोलिसांचे गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ दुकान मालकाचा आरोप –
याप्रकरणी दुकान मालक यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे दुकान मालकाकडून आरोप करण्यात येत असून याबाबत मंडे टू मंडे न्युज शी बोलतांना त्यांच्या कडून सांगण्यात आले तसेच चोरीच्या या नव्या फंडा मुळे सर्वच व्यावसायिकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे