क्राईममुक्ताईनगर

मुक्ताईनगरात बनावट रेशनकार्ड बनवण्याचा गंभीर प्रकार उघडकीस : दोघांवर गुन्हा दाखल !

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे प्रतिनिधी :  मुक्ताईनगर तहसील कार्यालयात बनावट सही शिक्याचा वापर करून बनावट रेशनकार्ड (शिधापत्रिका) बनवून देत शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या दीड वर्षांपासून मुक्ताईनगर तहसील कार्यालयात संशयित आरोपी अजाबराव सिताराम पाटील आणि पांडुरंग जयराम पाटील दोन्ही रा. चिखली ता. मुक्ताईनगर यांनी १४ ऑक्टोबर २०२० ते १४ फेब्रुवारी २०२२ च्या कालावधीत बनावट सही शिक्क्यांचा वापर करून बनावट रेशनकार्ड अर्थात शिधापत्रिका तयार करून शासनाची दिशाभूल करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. तहसील कार्यालयातच बनावट सही शिक्के व बनावट रेशनकार्ड तयार करत असल्याचा धक्कादायक माहिती समोर आल्याने मुक्ताईनगर तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. सदरील दोघां संशयितांवर प्रभारी पुरवठा निरीक्षक प्रदीप धनुसिंग आडे (वय-४२) रा. नांदेड यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!