भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

कपाशीच्या बनावट बियाण्यांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक


मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी : येथे नामांकीत कंपन्यांच्या बंदी असलेल्या व HTBT कपाशीच्या बनावट बियाण्यांची विक्री, साठवणूक करणार्‍या दोघांना येथे अटक करण्यात आली असून सदरील प्रकरण समोर आल्याने यातुन मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बनावट बियाण्यांची विक्री करून शेतकर्‍यांची फसवणूक करण्यात येत असल्याने दरवर्षी अनेक शेतकर्‍यांना यामुळे मोठा फटका बसत असतो. कपाशीच्या बियाण्यांची विक्री १ जून पासून सुरू झाली असून सदर बाब लक्षात घेऊन यंदा कृषी खात्याने आपल्या मोहिम अधिकार्‍यांच्या माध्यमातून यावर नजर ठेवली आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके निरिक्षक तसेच मोहिम अधिकारी विजय दगू पवार यांनी दिलेले फिर्यादी नुसार, बुधवारी काल दुपारी मुक्ताईनगरात कपाशीच्या बियाण्यांची तपासणी केली असता अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील एम जावेद पेट्रोल पंपाजवळच्या बस थांब्याजवळ प्रदीप शामराव पाटील ( रा. चिखली, ता. मुक्ताईनगर) आणि गोपाळ वामन जवरे ( रा. जवळा बाजार, ता. नांदुरा, जिल्हा बुलढाणा ) या दोन जणांजवळ बनावट बियाणे आढळून आलेत.


यात अंकुर सीडस आणि एचटीबीटी यांची एकूण ५६, ७०० रूपयांची बनावट बियाणे जप्त करण्यात आली आहेत. या अनुषंगाने या दोन्ही जणांच्या विरोधात रात्री उशीरा मुक्ताईनगर पोलीस स्थानकात मुक्ताईनगर पोलीस स्टेशन भाग ५ सीसीटिएनएस क्रमांक १९३ / २०२२ भा.द.वि कलम ४२०,३४ अत्यावश्यक वस्तु अधि, १९५५ चे कलम ३,९, बियाणे अधि नियम १९६८ चे कलम १९८३ १०, १५, १६, १७ बियाणे नियत्रंण आदेश १९८३ चे कलम ३,४, ७,८, ९, बिज अधिनियम ७ (ए) ७ (सी) ७ (डी) १४(ई), पर्यावरण संरक्षण अधि १९८६ चे कलम ८, ७ पर्यावरण संसक्षण अधिनियम १९८३ चे कलम ७ (१) (४), ८,१० चे उल्लघन, महाराष्ट्र कापुस बियाणे कायदा २००९ चे कलम २ (१) (३) (८) (१२), ११ (१), १२ (१) चे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!