Video | नाथाभाऊंवर ईडीच्या कारवाईची चर्चा ही निव्वळ अफवा– अॅड.रोहिणी खडसे
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर, अक्षय काठोके : सोशल मिडीयावर सुरू असलेली चर्चा निव्वळ अफवा असून त्यात कोणतेही तथ्य नाही नाथाभाऊं खाजगी कामानिमित्त दोन दिवस बाहेरगावी गेले आहेत शिवाय कोणतेही जप्ती, कारवाई वा नोटीस आलेली नाही, अशी माहिती जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणीताई खडसे यांनी मंडे टू मंडे शी बोलताना दिली. पहा रोहिणी खडसे नेमक्या काय म्हणाल्या… खालील व्हिडिओ मध्ये बघू शकता
अॅड.खडसे म्हणाल्या की, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना बुधवारी ईडीकडून नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्यावर ईडी कडून कारवाई झाल्याची माहिती ही निव्वळ अफवा असून नाथाभाऊं खाजगी कामानिमित्त दोन दिवस बाहेरगावी गेले आहेत त्यामुळे केवळ काही लोकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचे काम केले जात आहे. कुठलीही कारवाई झालेली नाही तसेच जप्तीदेखील झालेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली.