६ महिन्यांपासून मुक्ताईनगर डीवायएसपी पद रिक्त : संवेदनशील तालुक्याबाबत पोलीस प्रशासन मात्र असंवेदनशील
मंडे टू मंडे न्युज विशेष वृतांत :
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : जळगाव मधल्या राजकीय घडामोडी किंबहुना जळगाव पेक्षा ही मुक्ताईनगर मधील घडामोडी महाराष्ट्रात गाजत असतात. मात्र, राज्याच्या राजकारणात एक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं असल्येल्या मुक्ताईनगरात गेल्या फेब्रुवारी म्हणजे ६ महिन्यांपासून उप विभागीय अधिकारी हे महत्त्वाचे पद रिक्त असल्याचे वास्तव असून याचा परिणाम कामकाजावर होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून मुक्ताईनगर येथे पूर्ण वेळ आधिकारी दिला जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुक्ताईनगर तालुका शासन दरबारी जातीय सलोखा असल्याची ओळख असली तरी संवेदनशील तालुका अशी ओळख असलेल्या मुक्ताईनगरबाबत प्रशासन मात्र असंवेदनशील असल्याचे दिसून येते. मुक्ताईनगर येथे मुक्ताई एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु त्याच बरोबर ते आता अनेक कारणांनी गाजत आहे.
सध्या मुक्ताईनगर चर्चेत आहे ते रस्त्यावर झालेली फोटो शेयर केल्याचा आरोप करत महिलेकडून तरुणाला मारहाण करत असल्याची घटना आणि त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक होत पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या ठिय्या आंदोलन व कारवाईची मागणी, हे प्रकरण पुढे वाढत दोन्ही बाजुने गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी एका बाजूने १५०ते २०० अज्ञातांन विरोधात तर दुसऱ्या बाजूने ६ ते ७ जणां विरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले आहे. राजकारणाचा रंग देण्यात येत असल्यापासून ते खंडपीठात याबाबत दावा दाखल करण्यात येणार यापर्यंत पुढे हे प्रकरण तापले. अशा घटना घडत असतांना मात्र, पोलीस दलातील महत्त्वाचे असलेले उपअधीक्षक पद रिक्त असणे व पूर्णवेळ अधिकारी नसणे ही गंभीर बाब आहे. तालुक्यात सक्षमपणे निर्णय घेणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नितांत आवश्यकता आहे.
६ महिन्यापासून पोलिस उपअधीक्षक मिळेना ही गंभीर्याची बाब आश्चर्य कारक–
मुक्ताईनगर उप विभागीय अधिकारी यांचे कार्यक्षेत्रात मुक्ताईनगर, सावदा, बोदवड व वरणगाव अशी महत्वाची पोलीस ठाणे व या ठाण्या अंतर्गत येणारी सर्व लहान मोठी गावे येतात मात्र, तत्कालीन उपविभागीय अधिकारी विवेक लावंड यांची गेल्या फेब्रुवारी महिन्यात बदली झाली तेव्हा पासून हे पद रिक्त असून आज पर्यंत येथील अतिरीक्त चार्ज फैजपूरचे SDPO कुणाल सोनवणे यांच्या कडे आहे. डीवायएसपी कुणाल सोनवणे यांना फैजपूर व मुक्ताईनगर हे दोघ विभाग अंतर्गत येणारे कार्यक्षेत्र मोठे असल्याने हे सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत असक्याचे काही पोलीस खासगीत बोलून दाखवत असून पोलीस वर्तुळात तशी चर्चाही आहे. राष्ट्रवादीच्या ठिय्या आंदोलनावेळी आंदोलक व अधिकारी यांच्यातील शाब्दिक वादाचे अधिकाऱ्यांच्या दालनांत मीडिया कव्हरेज करत असतांना डीवायएसपी सोनवणे यांनी मीडियाला शुटिंगचा अधिकार नाही असे म्हटले होते यामुळे त्यांनी मीडियाला रोखण्याचा प्रयन्त केला, या वेळी मीडिया ला रोखण्याचा प्रयत्न का केला? याबाबतही बरीच चर्चा शहरात होत असल्याचे दिसत आहे.
तीन तालुक्यातील पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र असलेले पद रिक्त असणे म्हणजे यांवरून प्रशासनाची या विषयांवरील गांभीर्यता किती हे लक्षात येते. मुक्ताईनगर शहर हे जिल्ह्यातील एकमेव असे शहर आहे की येथे तीन मोठ्या नेत्यांचे वास्तव्य आहे, असे असतानाही येथे पोलीस विभागीय पद रिक्तच आहे. तीन तालुक्यातील पोलीस ठाणे लागू असलेले प्रमुख पद जास्त दिवस रिक्त रहाणे ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे डीवायएसपी देता का, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
यासंदर्भातील माहिती संकलनावेळी प्रकर्षाने एक गोष्ट लक्षात आली, जसे पोलीस प्रशासन रिक्त पदाबाबत गाड झोपेत आहे तसेच ना जळगाव जिल्हा पोलिस प्रशासनाची वेबसाईट अपडेट केली गेलीये व ना पोलीस ठाण्यातीळ अधिकाऱ्यांचा कार्यकाळ दर्शवणार बोर्ड अपडेट केले गेलेय, उपअधीक्षक ऑफिस मध्ये तर वेगळीच परिस्थिती आहे तर कार्यकाळ दर्शवणारा बोर्डच नजरेस पडून येत नाही. कर्मचाऱ्यांना विचारले असता त्याचा तुम्हाला अधिकार नाही ते करू शकत नाही अशी उत्तर दिली जातात. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यातील अजूनही बोर्ड २०१८ पासून अपडेट केला गेलेला नाही तेथे तत्कालीन अधिकाऱ्यांची नावे आहे. अधिकारी म्हणून नाव तत्कालीन अधिकाऱ्यांचे मात्र, सद्यस्थितीत चार्ज इतरांचा यामुळे सर्वसामान्य नागरिक संभ्रमावस्थे असतो की नेमके अधिकारी आहे कोणते ?