भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

राज्यात बिनखात्याचे उपमुख्यमंत्री, मतदारसंघाचे आमदार विकास कामांवर स्टे आणणारे; एकनाथ खडसेचा घणाघात

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : या राज्यात अजून पूर्ण मंत्रिमंडळ नाही. शिंदे सरकार अस्तित्वात नाही. ३७ दिवस झाले सरकारचा पोरखेडपणा सुरू आहे, या शब्दात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे सरकारसह आ.चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती टीका मुक्ताईनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात केली आहे.



मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विस्तृतआढावा बैठक आ एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली तर राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस जळगाव जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुक्ताईनगर येथे पार पडली यावेळी आ. खडसे म्हणाले, शिंदे सरकारचं अजून मंत्रिमंडळ नाही. दोघांचा कारभार सुरू आहे. एक मुख्यमंत्री तर दुसरा बिनखात्याचा उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे एकही खाते नाही. साऱ्या फायलींचा मुख्यमंत्र्यांकडे ढिग लागतोय. शिंदे सरकारचे अडीच वर्षे बाकी आहेत. मला असं वाटत नाही की, सरकार अडीच वर्ष टिकेल. एक वर्षात निवडणुका लागल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका. निर्णय घ्यायला या राज्यात कोणी नाही. राज्यातील जनता हवालदिल असून त्यामुळं राज्यातील विकासकामे रखडली असल्याचा आरोप खडसे यांनी केला.

महाविकास आघाडी चे सरकार जाऊन जे नविन सरकार अस्तित्वात आले आहे ते दोन लोकांचे स्थगिती सरकार आहे जनहिताच्या अनेक निर्णयांना या नविन सरकारने स्थगिती दिली शिंदे सरकारने एक महिना ओलांडला, तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या राज्यात निर्णय घेणार फक्त एकच व्यक्ती आहे. त्यामुळं एकूण किती दिवस हे सरकार टिकेल, काही सांगता येत नाही. या सरकारचा काही भरोसा नाही, असंही खडसे म्हणाले. राज्यातअनेक भागात पुरसदृश्य परिस्थिती असून सरकार मंत्रिमंडळ विस्ताराच्या बैठका घेण्यात व्यस्त आहे जनतेच्या समस्यांशी सरकारला देणे घेणे नाही आपण विरोधी पक्षात असलो तरी जनतेत जाऊन समस्या जाणून घ्या त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा. गेले तिस वर्ष आमदार असून कधीच धर्माचे जातीपातीचे राजकारण केले नाही आजचे आपल्या मतदारसंघाचे आमदार हे आपण आणलेल्या विकास कामांवर स्टे आणणारे आमदार असून गेल्या काळात आणलेल्या कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांवर त्यांनी स्टे आणला आहे सर्वांनी एकजुटीने पक्षाचे संघटन मजबूत करा त्यातून येत्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये आपल्याला निश्चित यश मिळेल एकंदरित कार्यकर्त्यांना तयारीला लागा, असाच काहीसा संदेश एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना दिला.


रोहिणी खडसे खेवलकर म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व धर्मभाव जपणारा पक्ष असून जनतेशी नाळ जुळलेला पक्ष आहे जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी येत्या स्वातंत्र्यदिना पासून राऊत झिरा ता बोदवड येथुन राष्ट्रवादी सुसंवाद यात्रेला सुरुवात करणार असुन 26 नोव्हेंबरला मुक्ताई मंदिर येथे यात्रेचा समारोप होईल या यात्रेच्या मुक्ताईनगर मतदारसंघातील प्रत्येक गावात जाणार असुन गावातील ज्येष्ठ सदस्य बंधू भगिनी ,युवा व युवती कार्यकर्ते, शेतकरी, कष्टकरी, महिला, दलित -आदिवासी सर्व घटकातील बांधवांशी यात्रेच्या माध्यमातून संवाद साधला जाईल त्यांच्या सार्वजनिक व वैयक्तिक समस्या जाणून संबंधित समस्या प्रशासनाच्या विभागा कडे सोडवण्यासाठी पाठविल्या जातील… स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने देशभक्ती /व राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण करून “स्वावलंबी गाव ” ही संकल्पना आगामी काळात गावा गावात राबविले जाईल. पक्ष संघटन मजबूत करणे त्यासाठी पक्षीय कार्यक्रम आगामी काळात दिले जातील असे रोहिणी खडसे यांनी सांगितले


जळगाव जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक म्हणाले,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकनाथराव खडसे यांनी प्रवेश केल्यामुळे पक्षाची स्थिती मजबूत झाली असून आगामी काळात त्यांच्या माध्यमातून जिल्हयात जास्तीत जास्त आमदार निवडून येतील तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये शंभर टक्के यश मिळेल तर रोहिणी खडसे खेवलकर या सुरू करत असलेल्या सुसंवाद यात्रेला त्यांनी शुभेच्छा दिल्या हि यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य भरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल असे त्यांनी सांगितले

मुक्ताईनगर तालुक्याबरोबर बोदवड तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती गट गणाचा आढावा घेण्यात आला यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणीचा आढावा, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक आढावा, जिल्हा परिषद गट गण प्रमुख नेमणूक करणे, बूथ रचना, राष्ट्रवादी युवक युवती काँग्रेस संघटनात्मक आढावा या सह इतर संघटनात्मक बाबीचा आढावा घेण्यात आला यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, माफदा अध्यक्ष विनोद तराळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, रमेश नागराज पाटील, प्रा डॉ सुनील नेवे सर,

युवक जिल्हा उपाध्यक्ष पवनराजे पाटील, कार्याध्यक्ष दिपक पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर, बोदवड तालुका अध्यक्ष आबा पाटील, महिला आघाडी तालुका अध्यक्ष रंजना कांडेलकर, युवक तालुका अध्यक्ष राजेश ढोले, सामाजिक न्याय सेल तालुका अध्यक्ष नंदकिशोर हिरोळे, शहराध्यक्ष राजु माळी, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी सभापती दशरथ कांडेलकर, विलास धायडे , विकास पाटील, प्रदिप साळुंखे, किशोर गायकवाड, किशोर चौधरी, जि प सदस्य निलेश पाटील, रामदास पाटील, मधुकर राणे, कैलास चौधरी, रामभाऊ पाटील, यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!