चांगदेव तापी पूर्णा संगम येथे आपत्कालीन बोटचे आ. चंद्रकांत पाटलांकडून लोकार्पण
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि | चांगदेव येथील तापी पूर्णा संगम नावाडी संघटनेच्या मागणीनुसार आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून आज तहसील कार्यालय या ठिकाणी आ. चंद्रकांत पाटील, तहसीलदार निकेतन वाढे, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील आदीच्या उपस्थितीत आपत्कालीन बोट चे लोकार्पण करण्यात आले.
बऱ्याच वर्षांपासून चांगदेव येथील तापी पूर्णा संगम नावाडी संघटना ही जिल्हाभर जनहिताची व प्रशासनाला वीणा मोबदला जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होते तेंव्हा व कुठेही दुःखद प्रसंगी कितीही खोल पाण्यात प्रेत सापडत नसेल अशा आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून जीव वाचविण्याचे व प्रेत कितीही खोल पाण्यात असले तरी काढण्याचे काम संघटनेचे युवक मोठया धाडसाने कोणताही मोबदला न घेता समाजसेवा म्हणून करत होते तसेच चांगदेव मुक्ताईनगर परिसरात महा शिवरात्री चे वेळेस व एकादशी निमित्त वारीला येणाऱ्या भाविकांना पाण्याचा अंदाज येत नाही त्या ठिकाणीं दिवस रात्र सेवा देत असतात गर्दीच्या ठिकाणी नदी काठी भाविकांचे प्राण वाचविणे हे कार्य अविरत पने 10/15 वर्षापासून करत आहे
मागील काळात संघटनेच्या अध्यक्ष राजेन्द्र भोई व सचिव संजय भोई व सर्व सदस्य सह चांगदेव चे माजी सरपंच पंकज कोळी यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन स्पीड बोट मिळावी जेणेकरून घटनास्थळी लवकर पोहचता येईल या करिता निवेदन देऊन मागणी केली होती. त्याची दखल घेत आमदार पाटील यांनी मागील आठवड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील व मदत व पुनर्वसन मंत्री मा.ना.अनिल भाईदास पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन निवारण बाबत व उपाय योजना करणे बाबत मीटिंग घेतली होती त्यात प्रामुख्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी चांगदेव येथील नावाडी संघटने चे कार्य व आपत्कालीन परिस्थितीत संघटनेचे युवक तात्काळ हजर होतात त्यांना शासन कोणतीही मदत अथवा यंत्र सामग्री देत नाही या करिता त्यांना तात्काळ स्पीड बोट व लाईफ गार्ड जॅकेट व इतर साहित्य ऊपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली होती.
याची तात्काळ दखल घेत मदत व पुनर्वसन मंत्री मा.ना अनिल भाईदास पाटील व पालकमंत्री यांनी कलेक्टर महोदय यांना सूचना देत बोट देण्याच्या सूचना दिल्या त्याचे आज प्रत्येक्षात भुसावळ प्रांत ऑफिस येथून बोट ताब्यात घेऊन ती मुक्ताईनगर उपविभागीय अधिकारी कार्यालय मार्फत येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करून संघटनेच्या स्वाधीन करण्यात आली या संघटनेच्या युवकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मार्फत 15 दिवसाचे जिल्हास्तरावर प्रशिक्षण सुध्दा देण्यात आले आहे.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे तहसिलदार निकेतन वाढे, शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, विधानसभा शेत्रप्रमुख सुनील पाटील, चांगदेव सरपंच निखिल बोदडे माजी सरपंच पंकज कोळी महेंद्र कोळी व संघटनेच्या अध्यक्ष राजेन्द्र भोई सचिव संजय भोई व सदस्य व शासकीय अधिकारी उपस्थित होते