भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

मुक्ताईनगर येथील अतिक्रमित घरे नियमाकुल होणार-आमदार चंद्रकांत पाटील.

Monday To Monday NewsNetwork।

मुक्ताईनगर प्रतिनिधी (अक्षय काठोके)। मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयात आमदार चंद्रकांत पाटील यांनी शहरातील चोहोबाजूला असलेल्या अतिक्रमित घरे रहिवास प्रयोजनार्थ असलेले सर्व निवासी घरे 2018 चे जीआर नुसार नियमाकुल करणे विषयी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या.

‌ त्याबद्दल सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर येथे अनेक वर्षापासून शहरात चहु बाजूला बहुजन समाजातील नागरिकांनी अतिक्रमण करून बांधलेले घरेआहेत व आज रोजी देखील त्यांचे कुटुंबासहित कायम वास्तव्य करून राहत आहे नगरपंचायत भोगवटा सदरी नोंद असून ती कायमस्वरूपी रेगुलाइज करून देण्यासाठी तहसीलदार यांच्या दालनात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना शासनाच्या जीआर ची माहिती देऊन तात्काळ शहराचा सर्वे करावा व मोजमाप करून प्रस्ताव तयार करा आणि वरिष्ठ अधिकार्‍यांकडे पाठवण्या विषयी सूचना केल्या सदर बैठकीत तहसीलदार श्वेता संचेती, प्रभारी मुख्याधिकारी शेख साहेब, भुमिअभिलेख चे नागरे साहेब, पंचायत समितीचे आर एल जैन विस्ताराधिकारी, विविध प्रभागाचे नगरसेवक, माजी पोलीस पाटील मोहन मेढे, ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्ते, सरपंच ग्रामपंचायत सदस्य, तसेच संबोधी नगरमधील रहिवासी जगदेव इंगळे ऑफिस खान सुशिलाबाई इंगळे प्रमिलाबाई तायडे उमाबाई गोसावी आशा तायडे वच्‍छलाबाई सावळे गाडे बाई आदी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते अतिक्रमण धारकांचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आमदार चंद्रकांत पाटील यांचे माजी पोलीस पाटील मोहन मेढे यांनी आभार मानले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!