भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

खळबळजनक : पैश्याच्या वादातून माजी सैनिकाचा खून : मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा

मुक्ताईनगर, प्रतिनिधी : येथुन जवळच असलेल्या वडोदा ते हलखेडा दरम्यानच्या जंगलात एका ५२ वर्षीय माजी सैनिकाचा खून खळबळजनक घटना घडली आहे. सदरील खून हा पैश्याच्या वादातून झाला असून खून केल्यानंतर १ लाख ६ हजाराची रोकड लांबविली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अनोळखी ६ ते ७ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गावातील मित्र अनिल आनंदा निकम यांच्यासोबत प्रल्हाद शिवमराम पाटील (वय-५२) रा. सावर्डे ता. कागल जि. कोल्हापूर हे दोघे चार चाकी वाहनाने शेगांव दर्शनासाठी ५ नोव्हेंबर रोजी निघाले. दरम्यान प्रल्हाद पाटील हे माजी सैनिक असल्यामुळे त्यांच्या परिचयाने व्यक्ती हलखेडा येथे राहत असल्याने त्यांना भेटून पुढे शेगाव दर्शनाला जाण्याचा ठरले होते. दरम्यान रात्री ९ वाजता प्रल्हाद पाटील यांनी एका मित्राला फोन करून बोलाविले. त्यावेळी एकजण त्यांना घेण्यासाठी दुचाकी घेवून आला. मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा गावाजवळील तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वढोदा ते हलखेडा जंगलात दुचाकीवर बसून प्रल्हाद पाटील आणि अनिल निकम हे दोघे गेले असता जंगलात आधीपासूनच ६ जण तेथे आलेली होती. यावेळी प्रल्हाद पाटील आणि पवार आडनाव असलेल्या तरूणांचा पैश्यांवरून बाचाबाची झाली. यात प्रल्हाद पाटील यांनी पुतण्या यांच्या फोन पे वरून ५५ हजार रूपये दिले. त्यानंतर त्यांच्या सोबत असलेले काही रक्कम असे एकुण १ लाख ६ हजार ५०० रूपये दिले. पुन्हा पैश्यांच्या वादावरून हाणामारी झाली. दोघांना जखमी करून अनोळखी ६ ते ७ जण घटनास्थळाहून पसार झाले. जखमी झालेले प्रल्हाद पाटील यांना उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अनिल निकम यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ६ ते ७ जणांविरोधात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल खताळ करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!