अंगावर वीज पडल्यानें शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे वृत्तसेवा : तालुक्यातील निमखेडी खुर्द येथील शेतकऱ्याच्या अंगावर आज दुपारी वीज कोसळल्याने शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर असे, तालुक्यातील निमखेडी खुर्द येथील अजय रुस्तम घोडकी (वय 38) हे हरताळा शिवारातील स्वतःच्या शेतामध्ये काम करत असताना त्यांच्या अंगावर आज दुपारी २:३० वाजेच्या सुमारास वीज पडल्यान जागीच मृत्यू झाला मृतदेह मुक्ताईनगर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी देण्यात आला आहे.