भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

मुक्ताईनगरातील बोगस कीटकनाशक प्रकरणात आर्थिक सेटलमेंट : अधिकाऱ्यांची मध्यस्थी ? चर्चेला उधाण !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर, अक्षय काठोके : दर्जेदार कीटकनाशकांच्या नावावर मुक्ताईनगर तालुक्‍यातील सातोळ गावातील शेतकऱ्याने, माझी फसवणूक झाल्याचा आरोप करत मुक्ताईनगरातील “सागर सिड” या नामांकित दुकानातील कीटकनाशक “बोगस’ असल्याचा गंभीर आरोप केला होता. व विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी ते व्हिडिओच्या माध्यमातून कीटकनाशक बोगस कसे हे दाखवले होते. याप्रकरणी नमुने तपासणीसाठी जळगाव येथील अधिकारी येऊन घेऊन गेलो होतो त्याचे तपासणी अहवाल गुरुवारी येणार होते मात्र, लॅब चे तपासणी अहवाल येण्याआधीच आता याप्रकरणात लाखो रुपयांची मोठी आर्थिक सेटलमेंट झाल्याची खात्री लायक माहिती अधिकारीक सूत्रांकडून मिळत असून तशी चर्चाही आहे. विशेष म्हणजे यात तडजोडीची मध्यस्थी म्हणून कृषी अधिकारीच असल्याचे बोलले जात असूनकाल पर्यंत कृषी विभागावर थेट आरोप करणारे विजय माधव कुलकर्णी यांनी अचानक माघार घेणे संशयास्पद असून यामुळे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून कुलकर्णी हे आर्थिक प्रलोभनाला बळी पडल्याने तडजोडीअंती तक्रार मागे घेतल्याची चर्चा मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात ऐकायला मिळत आहे.

याबाबत सखोल माहिती अशी, मुक्ताईनगरातील “सागर सीडस” या दुकानातून घेतलेल्या औषधाच्या फवारणीने मिरची पीकाची हानी झाल्यामुळे या दुकानावर कारवाई करावी अशा मागणीचे विजय माधव कुलकर्णी यांनी केली. मात्र यावर कुठलीच कारवाई होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे होते, म्हणून शेतकऱ्यांने मंडे टू मंडे शी संपर्क साधून याप्रकरणात न्याय मिळवून देण्याची मागणी केली त्यानुसार सदरील प्रकरणाला वाचा फोडत अन्याया विरुद्ध लढा देण्यासाठी प्रसार माध्यमांना हाक दिल्याने ग्राउंड झिरोवरून वृतांत केला सदरील शेतकऱ्यांचा म्हणण्यानुसार, सागर सीडस या दुकानातून बायो आर ३०३ हे औषध घेतले. याची आपल्या सातोड शिवारातील शेतातील मिरची पिकावर फवारणी केली. यामुळे पीकावरील रोग नाहीसा होण्याची अपेक्षा होती. मात्र याच्या अगदी उलट काही दिवसांमध्येच मिरचीचे पीक पूर्णपणे नष्ट झाले. या संदर्भात आपण कृषी केंद्रावर माहिती घेतली असता त्यांनी हे बोगस असल्याचे सांगितले त्यातील फरक दाखवला याप्रकरणी कृषी अधिकार्‍यांकडे तक्रार करून देखील आर्थिक सेटलमेंट असल्याने दुर्लक्ष करीत त्यांनी यावर काहीही कारवाई केली नसल्याचा आरोप शेतकऱ्याने कृषी अधिकाऱ्यांवर केला होता. याप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर येत असून लाखो रुपयांची मोठी आर्थिक तडजोड झाल्याची जोरदार चर्चा तालुक्यात असून विशेष म्हणजे संबंधित कृषी अधिकारी तडजोडीचे मध्यस्थी असल्याचे सर्वत्र बोलले जात असल्याने काल पर्यंत कृषी अधिकाऱ्यांवर व दुकांदारावर्ती थेट आरोप करणारे विजय कुलकर्णी यांनी प्रलोभनाला बळी पडून तडजोड केल्याने तक्रार मागे घेतल्याची खात्री लायक माहिती मिळत आहे.

विजय कुलकर्णी या शेतमालकाने प्रसार माध्यमांचा वापर करून मेवा खाण्याचे काम केले असून लाखोंची मोठी आर्थिक उलाढाल केल्याची माहिती मिळत आहे, सदरील इसमाकडून कृषी विभागाकडून न्याय मिळत नसल्याचे सांगत प्रसार माध्यमाना न्याय मिळवून देण्याची वारंवार विनंती करत होता. संबधित इसमाने फवारणी औषध बोगस असल्याचा स्पष्ट आरोप केला होता परंतु नंतर असे काय घडले की तक्रार मागे घेतली गेली. यातून एकच स्पष्ट होती की मोठी आर्थिक सेटलमेंट झाली आहे. किंवा विजय कुलकर्णी नावाचा इसम खोटे बोलून न्यायाच्या नावाखाली प्रसारमाध्यमांचा वापर करून घेत तडजोड करायच्या प्लॅन केला होता का? एकंदरीत यात शंका उपस्थित होते असून सदर विजय कुलकर्णी नामक इसमावर दुकानदार व कीटकनाशक उत्पादन कंपनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार का याकडे आता मुक्ताईनगर तालुकावाशीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

एकंदरीत शेतकऱ्याने प्रसारमध्यमासमोर एक तर खोटे आरोप केले किंवा तडजोड केली अशी शंका उपस्थित केली जात असून याप्रकरणात यांच्या भूमिकेवर परिसरातील नागरिकांकडून प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात असून याप्रकाराची चौकशी झाली तर कृषी संबंधी बोगस व तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या फायद्याची काही माहिती समोर येण्याची शक्यता असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. संबधित शेतकऱ्याने फवारणी औषध बोगस असल्याचा स्पष्ट आरोप केला होता परंतु सेटलमेंट नंतर स्वतःची व निसर्गाची चूक असल्याचे लेखी लिहून दिले म्हणजेच शेतकऱ्याने प्रसारमाध्यमासमोर खोटे आरोप केले होते का ? की यात तडजोड झाली… याबाबत ” मंडे टू मंडे न्युज ” कडे पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत, तडजोडीचे पुरावे लवकरच वाचकांसमोर आणणार असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे धाडस विभागा कडून वरिष्ठ पातळीवरून होईल का? सदर विजय कुलकर्णी नामक इसमावर कृषी विभाग कायदेशीर कारवाई करतील का?

याप्रकरणी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी तडजोडीच्या आरोपा संदर्भात संपर्क साधला असता त्यांच्याकडून संबधित आरोपांचा इन्कार करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!