भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

मुक्ताईनगर गोळीबार ; भुसावळ येथील पाच जणांच्या टोळीला अटक

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज, अक्षय काठोके l मुक्ताईनगर शहरात प्रवर्तन चौकातील लक्ष्मीनारायण प्रोव्हिजन दुकानासमोर दि.१९ रोजी खेवलकर कुटुंबाला लुटण्यात आले होते. त्यांच्याकडील सुमारे १ लाखांची रक्कम लुटण्यात आली. या लुटीच्या झटापटीत मंगेश खेवलकर यांच्या पोटात चाकू मारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यात त्यांना गोळी लागून गंभीर जखमी झाले आहेत. तर रविंद्र खेवलकर व रमेश खेवलकर हेही चाकू हल्ल्यात् जखमी झाले आहेत. या प्रकरणी जळगाव एलसीबी आणि मुक्ताईनगर पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली असून भुसावळ येथील ५ जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे.

मुक्ताईनगर शहरात प्रवर्तन चौकाजवळ रविंद्र रमेश खेवलकर हे दि.१९ रोजी आपले दुकान बंद करून बाहेर वडील आणि भावासोबत उभे होते. लक्ष्मीनारायण प्रोव्हिजन दुकानासमोरील फिर्यादी यांचे पानटपरीजवळ उभे असताना फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर चाकुने वार करुन फिर्यादीच्या हातातील रुपये असलेल्या एका पिवळ्या रंगांचे पिशवीतील रोख रक्कम बळजबरीने हिसकवुन घेवुन पळुन गेले होते. दरम्यान, झटापटीमध्ये मंगेश खेवलकर यांना गोळी लागल्याने ते जखमी झाले होते.

घटनास्थळी मिळालेल्या भौतिक व तांत्रिक पुराव्यावरून तसेच गुन्हा करतांना वापरलेली गुन्ह्याची पध्दत ही यापुर्वीचा रेकॉर्डवरील आरोपी प्रेम उर्फ गोपी अनिल धामणे, रा.वाल्मीक नगर भुसावळ याने केल्याचा संशय होता. पथकाने त्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता साथीदार रोहीत उर्फ दादु संजय नवघीरे, रा.वाल्मीक नगर भुसावळ, रिहान शहा करीम शहा, मिशन रफिक शेख, रा.जाममोहल्ला भुसावळ, कुंदन अनिल पठाळे, रा.भुसावळ यांनी केल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सर्व संशयितांकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेले गावठी कट्टा, ४ मोबाईल फोन, बुलेट, एक दुचाकी तसेच फिर्यादीकडून हिसकावलेले रोख रक्कम असे गुन्ह्याकामी रिकव्हरकरून वरील सर्व आरोपीतांना मुक्ताईनगर पोलीस स्टेशन C.C.T.N.S.No ४३४/२०२४, भा.न्या.सं. कलम ३०९ (६) शस्त्र अधि. १९५९ कलम ४/२५ या गुन्ह्यात मुक्ताईनगर पो.स्टे.ला जमा करण्यात आले आहे. गुन्ह्यात वाढीव कलम लावून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीतांना ६ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.

ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या पथकातील सपोनि राजेंद्र चाटे, सपोनि जयेश पाटील, पोना महेंद्र सुरवाडे, पोना सुरेश मेढे, पोकॉ गोविंदा पवार, सुनिल मोरे मुक्ताईनगर पोलीस स्टेशन, एलसीबीचे पोउपनिरी शरद बागल, हवालदार कमलाकर बागुल, गजानन देशमुख, गोपाल गव्हाळे, संघपाल तायडे, श्रीकृष्ण देशमुख, सचिन पोळ, महेश सोमवंशी अशांनी कारवाई केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!