भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

Video|नगरपंचायतीच्या गार्डनमध्ये दारूच्या बाटल्यांसह जुगाराचा डाव : नगराध्यक्षांसह पालिका प्रशासन गाड झोपेत !

मुक्ताईनगर, अक्षय काठोके : स्वच्छ भारत योजने अंतर्गत मोदी सरकारच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून देखील शहरातील गजबजलेल्या प्रवर्तन चौकात नगरपंचायतीच्या राजे छत्रपती शिवजी महाराज उद्यानांच्या नावाला काळिमा फासल्याचे काम होत असून दारुड्यांसह पत्ता जुगाराचे गोरख धंदा येथे खुलेआम पणे नगरपालिका प्रशासनाच्या नाकावर टिचून अड्डा मांडल्याने नगराध्यक्षांसह प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर मोठे प्रश्न चिन्ह उपस्थित होत असून उद्यानासाठी लाखोंचा पैसा अश्या गोरख धंद्यांना भर घालण्यासाठी खर्च केला आहे का ? सवाल आता मुक्ताईनगरवासीय विचारत आहे. पहा याबाबत व्हिडिओ वृतांत…

केंद्राकडून वित्त आयोगाच्या माध्यमातून वेळोवेळी  लाखो रूपयांचा निधी हा संबंधित प्रशासनाला मिळत असतांना मोदी सरकारच्या स्वच्छ भारत मिशन  या  महत्त्वाकांक्षी उपक्रमाला मुक्ताईनगर नगरपंचायत प्रशासनाद्वारे तिलांजली दिली जात आहे. मुक्ताईनगर शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या परिवर्तन चौकात राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानअसून  या उद्यानाच्या देखभालीसाठी मुक्ताईनगर प्रशासनाद्वारे लाखो रुपयांचा निधी खर्च होत असून प्रत्यक्ष वस्तुस्थिती मात्र अत्यंत दयनीय असून शराबखाना की उद्यान अशी आहे. सदर उद्यानामध्ये पाय ठेवण्यासही जागा नाही एवढे गवत वाढलेले आहे. हे  उद्यान हे चोवीस तास उघडे असून  बहुतांश व्यसनाधीन लोक दारुड्यांसह पत्ता जुगाराचे गोरख धंदा येथे खुलेआम पणे प्रशासनाच्या नाकावर टिचून अड्डा मांडल्याने नगराध्यक्षांसह प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर मोठे प्रश्न चिन्ह उपस्थित होत असून उद्यानासाठी लाखोंचा पैसा अश्या गोरख धंद्यांना भर घालण्यासाठी खर्च केला आहे का ? असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडलेला आहे.

यासर्व प्रकाराकडे नगराध्यक्षांसह प्रशासन मुद्दाम कानाडोळा करत असल्याचे चित्र असून एवढी दुर्गंधी व भयावह परिस्थिती या उद्यानाची प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाली असून शहरातील नागरिकांद्वारे वारंवार तक्रारींनंतरही प्रशासन गाड झोपेत असल्याचे दिसते. तरी आपण आपल्या स्तरावरून  मुक्ताईनगर न.प.अंतर्गत असलेल्या राजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची दुरावस्था तात्काळ सुधारण्याचे आदेश देऊन कामात केलेल्या दिरंगाईची चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा अन्यथा तीव्र जनआक्रोश आंदोलन छेडण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!