क्राईममुक्ताईनगर

अज्ञात वाहनाची बुलेटला जोरदार धडक; दोन युवक ठार !

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी |तालुक्यातील घोडसगाव येथिल उड्डाण पुलाजवळ अज्ञात वाहनाने बुलेटला दिलेल्या धडकेत दोन युवक ठार झाल्याची घटना घडली याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील उड्डाण पुलाजवळ काल रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला अज्ञात वाहनाने एमएच १९ सीएस ६९६८ क्रमांकाच्या बुलेटला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की यावर स्वार असलेला पृथ्वीराज चव्हाण आणि सागर गोपाळ हे दोन तरूण जागीच ठार झाले.

याघटने प्रकरणी चरणसिंग सावजी चव्हाण (रा. कापूसवाडी, ता. जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अज्ञात वाहन चालकाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!