ज्ञानदादाकडून मुक्ताईस भाऊबीजेची साडीचोळी भेट : आळंदी व मुक्ताईनगर दोन्ही संस्थानने जपली परंपरा
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : बहीण मुक्ताबाईस बंधू ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडील साडीचोळी भाऊबीजेच्या पर्वावर अभिषेक पूजनाने संत मुक्ताबाईस परिधान करण्यात आली. संत परंपरेत बहीण भावाचे नाते जपणाऱ्या या भाऊबीज उत्सवाला पहाटे मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपस्थिती लावली होती.
दर वर्षी आषाढीला भाऊराया ज्ञानदादा कडून दिला जाणारा या साडी चोळी भेटीचा अमूल्य ठेवा मोठ्या सन्मानाने जपून ठेवला जात भाऊबीजला संत मुक्ताई यांना मोठ्या भक्ती भावाने परिधान केला जातो. ज्या प्रमाणे पंढरीत मुक्ताबाईस साडीचोळी प्रदान केल्या जाण्याच्या भावपूर्ण सोहळ्याला उपस्थित भाविक हा सोहळा पाहून भाविक कृतकृत्य होतात. त्याच प्रमाणे हीच साडी चोळी भाऊबीजेच्या दिवशी मुक्ताबाईला परिधान करण्यात येते या भाऊबीज उत्सवास साक्षीदार होण्यासाठी पहाटेच भाविकांची मांदियाळी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई नवे मंदिर येथे जमली होती
ह्यावेळी संत मुक्ताबाई मंगेश महाराज वराडे दाताळकर यांनी पंचामृताने अभिषेक पुजा आरती केली. संस्थान अध्यक्ष रविंद्र पाटील, पंजाबराव पाटील, संदीप पाटील ,सम्राट पाटील , रविंद्र महाराज हरणे, व्यवस्थापक विनायक पाटील, उध्दव जुनारे, महंत नितिन दास महाराज, मंगेश महाराज, पुरषोत्तम भाऊ वंजारी, वराडे, ज्ञानेश्वर हरणे, संजीवन अजानवृक्षसेवक मनोज ठाकरे व भाविक उपस्थित होते..