मुक्ताईनगरच्या प्रभाग १३ मध्ये साचले पाण्याचे हौद नागरिकांचे आरोग्य धोक्यात !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : सद्या मुक्ताईनगर (muktainagar) प्रभाग क्रमांक १३ मध्ये प्रशासन व नगरसेवकांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रभागात पाण्याचे डोह ठीक ठीक साचल्याने पहायला मिळत असून नागरिकांना अशा नरक यातनां सहन करत यातून वाट काढावी लागत असलयाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
एकीकडे पावसाळ्यात साथीच्या रोगांसंदर्भात प्रत्येक भागात लक्ष देत असताना प्रभाग क्रमांक १३ मध्ये नगरसेवकांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले प्रभाग क्रमांक १३ मधील रेणुका माता मंदिराच्या वरदडीच्या रस्त्यात तर अक्षरशः पाण्याचे डबके साचले असून नागरिकांना पायी चालणे हे मुश्किल झाले आहेत. त्या भागात जास्त क्लासेस असल्यामुळे विद्यार्थ्यांना पायी चालणे व सायकलवरून चालणे धोक्याचे झाले आहे विद्यार्थी रोज तेथून चिखलामध्ये पडत आहेत. साई मंदिरासमोर पाण्याचा हौद साचला असून मोठ्या प्रमाणावर डास तयार झालेले आहेत.
एवढेच नव्हे तर प्रभागात असलेल्या अंगणवाडीत जावे कुठून? इतपत चार बाजूंनी पाणी साचलेले आहेत. प्रभागात मोठ्या प्रमाणावर गवत वाढले असून भर दिवसा मोठे साप ह्या प्रभागात वावरताना दिसतात. समाधान माळी ते बीएसएनएल टॉवर पर्यंतच्या प्रभागाचा विस्तार असून प्रभागात कुठेही सहज पायी चालता येत नाही. एवढी विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रभागात सर्वत्र गटारी तुडुंब भरले असून किती तरी वर्ष झाले गटारींचे सफाई झालेली नाही.
पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून पावसाचे पाणी झेलून प्रभागातील लोक आपला दिवस घालवत आहे. सुमारे एक आठवड्यापासून नळाला पाणी आलेले नाही. प्रभागात मूलभूत प्रश्नांच्या एवढ्या समस्या आहेत की आपण पाषाण युगात तर जगत नाही आहोत? असा प्रश्न नागरिक एकमेकांना विचारत आहेत. आता तरी प्रशासन व नगरसेवकांना जाग येईल का असा सुद्धा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे.