भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

Breaking : मुक्ताईनगरात अवजड वाहतुकीने घेतला बळी, भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर शहरातील संत मुक्ताई महाविद्यालयसमोर शुक्रवारी रोजी सायंकाळच्या सुमारास अवजड वाहने रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरित्या उभा असल्याने बसला ओव्हरटेक करत असतांना दुचाकीस्वार बसच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून सोबत असलेला दुसरा बचावला आहे.

मुक्ताईनगर शहरातून गेलेल्या बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या संत मुक्ताबाई महाविद्यालयासमोर शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी अवजड वाहतूक करणारा ट्रक हा अवैधपणे रस्त्यांच्याकडून जात होता. मागून येणाऱ्या बस क्रमांक (एमएच १० डीएल ३५५५) ला आव्हरटेक करतांना दुचाकीने किसन तलवारे व सोबत तुळशीराम वानखेडे दोघे दुचाकीस्वार जात असताना दुचाकीस्वार हा बसच्या चाकाखाली आल्याने किसन उर्फ कृष्णा तलवारे (वय-३४) रा. बोदवड ता. मुक्ताईनगर ह.मु. इच्छापुर या तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तर सोबत असलेला तुळशीराम वानखेडे सुदैवाने बचावला आहे.

घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर शहरातील स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतदेह उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर अवजड वाहतूक करणारे वाहन घेवून चालक पसार झाला आहे. या घटनेबाबत मुक्ताईनगर पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते

अवजड वाहतुकीमुळे मुक्ताईनगरात अपघात नित्याची बाब–    मुक्ताईनगर शहरात भले मोठे कंटेनर व ट्रक प्रवेश करीत असून शहरातील नागरिक व शाळकरी मुलांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते सध्या बोदवड चौफुली वरती दोन होमगार्डची नियुक्ती करून प्रशासनाने अवजड वाहतुकीला तात्पुरती प्रवेश बंदी केली असली तरीही पुरणाड फाट्या वरून मुक्ताईनगर शहरात अवजड वाहतूक होत आहे यावर कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!