संतांची भूमी मुक्ताईच्या पावन भूमीत अवैध दारूचा महापूर ! स्थानिक प्रशासनाची खुली सूट ?
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी अवैध देशी-विदेशी दारू किरकोळ अथवा होलसेल भावात सर्रास विक्री होत आहे कुठलाही परवाना नसताना ही दारू कशी विकली जाते ? हा गहन संशोधनाचा विषय असून हा नेमका विक्रीचा प्रकार आहे तरी कुठला ? याकडे प्रशासनाचे लक्ष का नाही ? आर्थिक रसद पोहचत असल्याने नेमका कानाडोळा केला जात असल्याचे ऐकायला मिळत असून यामुळे संत मुक्ताईच्या पावन भूमीत सट्टा-पत्ता दारू अश्या अवैध धंद्यांना ऊत आला असून स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबतचे एक ना अनेक प्रश्न जागोजागी नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
मुक्ताईनगर शहरांमध्ये बऱ्याचशा ठिकाणी हॉटेलचे नाव करून दारू विक्री केली जाते. हा प्रकार पोलीस प्रशासनाच्या लक्षात का येत नाही ? हा प्रकार त्यांना दिसत नसावा का ? की या सर्व प्रकाराकडे जाणून बुजून डोळेझाक केली जात आहे ? या कारना मुळे तर हप्ते वसुलीच्या मायाजालात स्थानिक पोलिसांकडून कारवाई शून्य होत नाही न असा प्रश्न नागरिक उपस्तीत करत आहे. असे प्रश्न नागरिकांना पडत असून या प्रकारावर स्थानिक पोलिसांकडून कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे स्थानिक प्रशासनाचेही यात साटेलोटे असल्याचे परिसरात बोलले जात आहे. शहरामध्ये बऱ्याच काही ठिकाणी हात गाड्यांमध्ये दारूचा मोठा व्यवसाय होत असून भर चौकामध्येही दारू मोठ्या प्रमाणात विकली जात असल्याचे चित्र सामान्य माणसाच्या नजरेस पडते मात्र पोलीस प्रशासनाच्या नजरे पडत नाही का ? यात गौडबंगाल नक्की काय अशे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होते आहे.
विशेष म्हणजे राज्यासह तालुक्यातील भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या मुक्ताई मंदिर परिसरातील मुक्ताई चौक, बोदवड रोड, मुंबई नागपूर हायवे लागून छोट्या टपरीतसुद्धा दारू विक्री केली जाते. काही लायन्सन असलेल्या दुकानांमध्ये मुद्दे मालाचा स्टॉकपेक्षा जास्त माल उपलब्ध असतो. त्या ठिकाणी आर्थिक सेटलमेंट असल्याने कारवाई होत नाही अशे सर्वत्र चर्चिले जात असून मुक्ताईनगर शहरामध्ये अथवा तालुक्यामध्ये जळगाव येथील एल सी बी रेड बहुतांशवेळा पडलेली आहे. मात्र स्थानिक पोलिसांकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष का केलं जातं ? ही बाब गुलदस्त्यातंच असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
मागील मुक्ताईनगर मध्ये प्रभारी पी आय रामकृष्ण पवार असताना मुक्ताईनगरमध्ये स्थानिक ठिकाणी बहुतांश वेळा हातभट्टीचे अथवा देशी दारूचे मोठे जाळे त्यांनी पकडले होते. व वरील अवैध कामास आळा बसावा यासाठी त्यांनी जोरात कारवाई सुरू केली होती त्याचाच परिणाम म्हणून त्यावेळेस अवैध धंदे बंद झाले होते. त्यामुळे त्यांची तात्काळ बदली केली गेली असावी ! अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. तालुक्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ अधिकारी पोलीस अधिक्षक डॉ. मुंढे, डीवायएसपी लावणं या प्रकाची गंभियाने दखल घेत लक्ष घालून आळा घालता का याकडे आता संत मुक्ताईच्या भक्तांचे लक्ष लागून आहे.