मुक्ताईनगरात गावठी पिस्तुल बाळगणाऱ्यास अटक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : शहरातील भोईवाडा येथिल बेकायदेशीर गावठी पिस्तूल घेवून फिरणाऱ्या संशयित आरोपीला मुक्ताईनगर पोलीसांनी अटक केली असून याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर पोलीसांना रवि उर्फ माया महादेव तायडे (वय-२५) रा. भाईवाडा मुक्ताईनगर हा तरूण बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने त्यानुसार पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे आणि पो.कॉ. सचिन जाधव यांनी संशयित आरोपीला रविवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास राहत्या घरातून अटक केली असून त्याच्या ताब्यातील गावठी बनावटीचा पिस्तून हस्तगत केली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहे.