सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ मुक्ताईनगर तहसीलदार व पो.निरीक्षक यांना निवेदन
Monday To Monday NewsNetwork।
मुक्ताईनगर प्रतिनिधी (अक्षय काठोके)। मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाची अनेक वर्षापासून मागणी होती त्यासाठी मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे काढले बेचाळीस मराठा बांधवांनी आत्मबलिदान दिले मराठा समाजाला आरक्षणाची खऱ्या अर्थाने गरज होती मात्र असे असताना देखील मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही .
सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा तरुण देशोधडीला लागून त्याचे भविष्य अंधकारमय झाले आहे यासाठी मुक्ताईनगर सकल मराठा समाज बांधवांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला निवेदन देते वेळी समाज अध्यक्ष आनंदराव देशमुख, उपाध्यक्ष माणिकराव पाटील, सचिव यू डी पाटील कोषाध्यक्ष वसंत पाटील सहसचिव संदीप बागुल संचालक ईश्वर रहाणे ,दिनेश कदम ,दिलीप पाटील (सर)संतोष मराठे ,नवनीत पाटील ,एडवोकेट पवन राजे पाटील व इतर समाज बांधव उपस्थित होते