भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

Breaking : मुक्ताईनगर नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रक्रियेस स्थगिती !

मुक्ताईनगर, अक्षय काठोके : येथील नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी आज निवड होणार होती परंतु निवणूक रद्द करण्यात आली असल्याची माहिती समोर येत असून राजकिय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खडसेंचे स्विह साहाय्यक योगेश कोलते सर यांनी याबाबत माहिती दिली आहे. काही तास उरले असतानाच उच्च न्यायालयांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटातील राज्यातला पहिला नगराध्यक्ष बनता बनता राहिला आहे.

याबाबत मिळालेली माहिती असे, आज दि.१८ जुलै रोजी शिंदे गट शिवसेना व भाजपा पक्षातर्फे पियूष भागवत मोरे (महाजन) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांचा एकमेव अर्ज असल्याने मोरे यांचा विजय निश्चित मानला जात होता परंतु आजची निवडणूक प्रक्रिया पुढील आदेश येई तोवर स्थगित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी मला दिल्याचे प्रांताधिकारी सुलाने यांनी सांगितले आहे. परंतु याबाबत लेखी आदेश अद्याप प्राप्त झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

यासंदर्भात आ. एकनाथ खडसें स्विह साहाय्यक कोलते यांनी मुक्ताईनगर नगराध्यक्ष पदांची निवडणूक ही रद्द करण्यात आल्याचे “मंडे टू मंडे न्युज” शी बोलतांना सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!