मुक्ताईनगरच्या नगराध्यक्षां नजमा तडवी अपात्र : जिल्हाधिकार्यांचा निर्णय
मुक्ताईनगर, अक्षय काठोके : येथील नगरपंचायतीच्या भाजपच्या नगराध्यक्ष सुरेखा तडवी उर्फ नजमा तडवी यांनी जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर करण्यास कसूर केल्याने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी नगराध्यक्ष पदावरून अपात्र केल्याने मुक्ताईनगर तालुका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक असे की, मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवणुकीत अनुसूचित जमाती आरक्षित जागवेरून नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या भाजपच्या सुरेखा तडवी उर्फ नजमा तडवी यांनी जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने या संदर्भात जिल्हाधिकार्यांकडे मुक्ताईनगर येथील गिरीश रमेश चौधरी यांनी नगराध्यक्ष याना अपात्र करण्यात यावे यासंदर्भात अपील अर्ज दाखल केली होता. याप्रकरणी सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करायचे होते मुदतीत बदल करून बारा महिने करण्यात आले होते मात्र जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्यामुळे मुक्ताईनगर नगराध्यक्षा यांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सोमवार, 8 नोव्हेंबर रोजी अपात्र घोषित केल्याने मुक्ताईनगरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत नजमा तडवी यांच्याशी मंडे टू मंडे चे स्थानिक प्रतिनिधी यांनी संपर्क साधला असता यांनी सांगितले की, माझ्या कडे जात वैधता पत्र असून मी नंदुरबार येथे समितीकडे कागपत्र सादर केले होते मात्र समितीने दोन महिने उशिरा कागपत्र दिले असून याप्रकरणात राजकारण होत असल्याचा त्यांनी आरोप केला असून त्याच्या सादरीकरणाचा कालावधी दीड वर्षाच्या वाढीव असून तो GR माज्या कडे असून मी या निकालाविरोधात अपिलात जात असल्याचे नजमा तडवी यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
तसेच गिरीष चौधरी या प्रकरणातील याचिकाकर्ते गिरीष चौधरी म्हणाले की, यापुढील काळात नगरपंचायतीच्या घनकचरा व इतर निविदा प्रक्रियेसह माझी वसुंधरा कार्यक्रमातील भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा आपला प्रयत्न असणार आहे.