आई वडिलांचे छत्र हरपलेल्या अनाथ बालकांना आ. चंद्रकांत पाटिलांचा आधार, स्वीकारले पालकत्व
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : तिर्थक्षेत्र मुक्ताईच्या दरबारातील बाल संस्कार शिबिरात आई वडिलांचे छत्र हरपलेल्या अनाथ बालकांचं पालकत्व आमदार चंद्रकांत पाटिल यांनी स्वीकारलं आहे.
तिर्थक्षेत्र मुक्ताईच्या दरबारात बाल मनावर सु-संस्कार व धर्म, संस्कृती ,अध्यात्म शिक्षण देऊन वारकरी संप्रदायाचे संस्कार घडविले जात आहेत. येथे आळंदी सह बुलढाणा, अकोला, जळगांव व धुळे जिल्ह्यातून किमान २०० च्या वर बालकांनी हजेरी लावलेली आहे. हे शिबीर श्रीमंत संत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्था,आळंदी देवाची ता. खेड जि.पुणे तर्फे आयोजित करण्यात आलेले असून दि.१ मे पासून या कार्यक्रमास प्रारंभ झाला आहे तर दि.१५ मे रोजी पालखी सोहळा प्रमुख ह.भ. प रवींद्र हरणे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाचे या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मुक्ताईनगर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील यांनी दि.५ मे रोजी गुरूवारी भेट दिली. व बालकांना मार्गदर्शन करून अगदी कमी वयात अध्यात्माची उंची गाठणाऱ्या व आपल्यासह इतरही बालकांवर वारकरी संप्रदायाचे संस्कार व्हावे हा उदात्त हेतू उराशी बाळगून शिबीराचे आयोजन करणाऱ्या स्वप्नील महाराज, आळंदीकर यांचे कौतुक केले व आई मुक्ताई तुमच्या कार्यास सिद्धी नेवो अशी भावना व्यक्त करून खूप खूप शुभेच्छा दिल्या. यावेळी शिबीराचे आयोजक हे आई वडील नसलेल्या किमान १० मुलांचे संगोपन करीत असल्याची माहिती मिळाली त्यातील अगदी ६ वर्षाचा चिमुकला त्यांनी पाहिला ज्याचे आई वडिलांचे छत्र हरपले आहे त्या बालकाला पाहून आमदार चंद्रकांत पाटील यांना गहिवरून आले.
व त्यांनी स्वप्नील महाराज यांना सूचना केली की या मुलाचे पुढील शिक्षणाच्या सर्व खर्चाचे पालकत्व मी घेतो असे जाहीर केले व आणखी काही पालकत्व हरपलेले बालक असतील त्यांची माहिती द्या असे सांगितले. यावेळी आमदार पाटील यांची बाल संस्कार शिबिराला दिलेली भेट ही उदली पालकत्व हरपलेल्या बालकासाठी आयुष्याची कलाटणी देणारी ठरली. आमदारांनी एका सेकंदात बालकाचे शिक्षणाचे पालकत्व घेतल्याने एक उदार मनाचे भावनिक राजकीय व्यक्तिमत्त्व चंद्रकांत पाटलांच्या रूपाने येथे पाहायला मिळाले. यावेळी शिवसेना शहर संघटक वसंत भलभले, गटनेता निलेश शिरसाट, नगरसेवक पियूष मोरे, संतोष मराठे , माऊली महाराज कर्की, ह भ प सौ दूर्गाताई संतोष मराठे , भूषण महाराज पिंपरी आकराउत, अनिल मराठे महाराज, बाळू सोनार आदींची उपस्थिती होती.