आ. चंद्रकांत पाटील “पलटी मारणारा माणूस “; पक्षबळकटीसाठी जनसंवाद यात्रा महाराष्ट्राला प्रेरणादायी– आ.अनिल पाटील
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : पक्षप्रमुख उद्धव ठाकरेना जो झाला नाही तो सामान्य कार्यकर्त्यांना काय होणार? आ. चंद्रकांत पाटील “पलटी मारणारा माणूस” असल्याची टीका करत आमदार अनिल पाटील यांनी विधानसभा मतदारसंघात रोहिणी खडसे-खेवलकर यांनी जनसंवाद यात्रेच्या रूपाने फार मोठे पाऊल उचलले असून या उपक्रमाचा फायदा आगामी सर्व निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसला होईल. असे प्रतिपादन आ. अनिल पाटील यांनी केले आहे.
जळगाव जिल्हा राष्ट्रवादीमय करण्याची जबाबदारी पक्षनेते शरदचंद्रजी पवार यांनी नाथाभाऊंवर सोपवली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा ग्रीन सिग्नल मला खडसे साहेबांनी दिला म्हणून मी आमदार होऊ शकल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भर पावसात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची जमलेली मोठी गर्दी हाच माझ्यासाठी फार मोठा सत्कार आणि सन्मान आहे असे सांगून आ. अनिल पाटील यांनी वेळेअभावी सत्कार घेणे टाळले. ज्यांच्या शब्दाने निवडून आले अशा पवार साहेबांना जो झाला नाही, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांना जो झाला नाही तो सामान्य कार्यकर्त्यांना काय होणार?असे सांगून, “पलटी मारणारा माणूस” आ.चंद्रकांत पाटील असल्याची टीका देखील यावेळी आमदार पाटील यांनी केली.
15 ऑगस्टचा मुहूर्त साधून सौ रोहिणी खडसे यांनी संपूर्ण मतदारसंघात संवाद यात्रा सुरू केली असून या यात्रेची सुरुवात बोदवड तालुक्यातील राऊत झिरा येथे महादेव मंदिरात सुरुवात करण्यात आली ही यात्रा आज राऊत झीरा,शेवगा, धोंडखेडा,कुऱ्हा-हरदो अश्या चार गावांमधे संपन्न झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे, रोहिणी खडसे, अमळनेरचे आमदार अनिल पाटील, संदीप पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष यु डी पाटील, यात्रा प्रमुख ईश्वर रहाणे, निवृत्ती पाटील, बोदवड तालुका अध्यक्ष आबासाहेब पाटील, रावेरचे तालुकाध्यक्ष विशाल कोंडे आदींसह रामभाऊ पाटील भागवत टीकारे, कैलास चौधरी जि प सदस्य निलेश पाटील, बी सी महाजन, चंद्रकांत पाटील, सुनील पाटील,अनिल पाटील सुधीर तराळ,विलास धायडे, दीपक पाटील, महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्ष अश्विनी पाटील बोदवड शहराच्या उपाध्यक्ष कविता गायकवाड आदींसह कार्यकते उपस्थित होते