मुक्ताईनगर छेडखानी प्रकरण : ॲड. केतन ढाके यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मुक्ताईनगर येथील मुक्ताई यात्रेत तरुणींची झालेल्या छेडखानी प्रकरणात ॲड. केतन ढाके यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आली असून या बाबतचे आदेश आज विधी व न्याय विभागाच्या कक्ष अधिकारी वैशाली बोरूडे यांनी जारी केले.
मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई यात्रा सुरू असतांना कोथळी गावात मुक्ताबाई यात्रे दरम्यान २८ फेब्रुवारी रोजी रात्री ८:४५ वाजता या मुली यात्रेत फिरत असतांना येथे त्यांची छेडखानी करण्यात आली होती. या बाबत मोठी खळबळ उडाली. यात केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या कन्येचा समावेश असल्याने सर्वत्र हे प्रकरण चर्चेत आले.
प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात सदर मुलींनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता लैंगीक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण पोस्को कायद्या अंतर्गत सात जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात काही आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणातील तीन संशयित आरोपी हे अजून देखील फरार आहेत.
दरम्यान, आज या प्रकरणात ॲड. केतन ढाके यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचे आदेश आज विधी व न्याय विभागाच्या कक्ष अधिकारी वैशाली बोरूडे यांनी जारी केले आहेत. या छेडखानी प्रकरणात ॲड. केतन ढाके यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्या मुळे मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई यात्रा छेडखानी प्रकरण कोर्टात जलद गतीने चालण्याची शक्यता वर्तविली जात आहे.