मुक्ताईनगर मुलींची छेडखानी प्रकरण : माजी नगरसेवकांसह सात आरोपींवर गुन्हा दाखल
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज अक्षय काठोके | मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई यात्रे दरम्यान केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येसह मुलींच्या छेडखानी प्रकरणात राजकिय क्षेत्रातून कठोर कारवाईची मागणी होत असून खुद्द मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी यात विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी असल्याचे म्हणत कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेश दिले म्हटले असून या प्रकरणात सात जणांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एक माजी नगरसेवक आहे.
या संदर्भातील प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील कोथळी गावात मुक्ताबाई यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या कन्या तिच्या मैत्रिणींना छेडछाडीचा गंभीर प्रकार घडला असून यातील पहिली घटना २४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास फराळ वाटपाच्या कार्यक्रमाच्या स्टॉलजवळ घडली. या ठिकाणी आरोपी अनिकेत भोई याने या मुलींकडे पाहून अश्लील हातवारे केल्याचे मुलींचे म्हणणे आहे.
कोथळी गावात मुक्ताबाई यात्रेदरम्यान २८ फेब्रुवारी रोजी रात्री ८:४५ वाजता या मुली यात्रेत फिरत असतांना आकाश पाळण्याजवळ अनिकेत भोई याच्यासह पियुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील, किरण माळी, चेतन भोई आणि सचिन पालवे यांनी फिर्यादी व तिच्या मैत्रीणींचा पाठलाग करून त्यांच्या सोबत लज्जास्पद कृत्य केले. यातील पीयूष मोरे माजी नगरसेवक आहेत.
तसेच त्यांनी या मुलींचा व्हिडीओ मोबाईलमध्ये काढला. दरम्यान, या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात सदर मुलींनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता लैंगीक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण पोस्को कायद्या अंतर्गत १) अनिकेत भोई, २) पियुष मोरे, ३) सोहम कोळी, ४) अनुज पाटील, ५) किरण माळी, ६) चेतन भोई ७) सचिन पालवे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पुढील तपास मुक्ताईनगरचे पोलीस निरिक्षक नागेश मोहिते व सहाय्यक पोलीस निरिक्षक जयेश पाटील हे करत आहेत.