मुक्ताईनगरात राष्ट्रीय मतदार दिन संपन्न, ‘लोकतंत्र की पहचान है..मत..मतदाता और मतदान. .. यही हमारी जिम्मेदारी है…! – तहसीलदार श्वेता संचेती
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे वृत्तसेवा। तहसील कार्यालय, मुक्ताईनगर आणि श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने ऑनलाइन गुगल मीट द्वारे राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सुनील सूर्यवंशी मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तर प्रमुख पाहुणे श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एच. ए. महाजन आणि संत मुक्ताबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय.डी.पाटील तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख संयोजिका मुक्ताईनगरचे तहसीलदार मा. श्वेता संचेती, नायब तहसीलदार मा. प्रदीप झांबरे आणि डॉ. अनिकेत वाडे उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे प्राचार्य महाजन यांनी ‘मतदार राजा जागा हो…आणि लोकशाहीचा धागा हो…!असे आवाहन केले. तर प्राचार्य पाटील यांनी ‘पुरुष असो..वा..स्त्री …मतदान आहे सर्वांची जबाबदारी’…! असे उद्बोधन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मा.सूर्यवंशी यांनी ‘बनो देश के भाग्यविधाता…अब जागो प्यारे मतदाता…बच्चो बच्चो की पुकार है …मतदान करना जरुरी है…मतदान करना जरुरी है …हर बार …हर बार…!असा नारा दिला. तसेच तहसील कार्यालयाच्या वतीने वक्तृत्व निबंध आणि चित्रकला स्पर्धेत पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे त्याच बरोबर उत्कृष्ट डाटा ऑपरेटर विक्रम बाळू वानखेडे, उत्कृष्ट बी. एल. ओ. पर्यवेक्षक शिक्षण विस्तार अधिकारी राजू इब्राहिम तडवी आणि उत्कृष्ट बी. एल.ओ.म्हणून कार्य केलेले- अनंत गजानन कोळसकर (हिवरे-उमरे), उमेश भागवत चौधरी (पुरनाड) शेख जाकीर शेख (कुहृा) तसेच नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांना जिल्हास्तरीय निवडणूक मतदार जनजागृती अभियानाचा 2021-22 चा पुरस्कार मिळाल्याबद्दल जाहीर अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख संयोजिका मा. तहसीलदार श्वेता संचेती यांनी ‘लोकतंत्र की पहचान है..मत..मतदाता और मतदान. ..यही हमारी जिम्मेदारी है…! असे उद्बोधन केले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी नायब तहसीलदार झांबरे यांनी सर्वांना राष्ट्रीय मतदान दिनाची शपथ दिली.
तहसील कार्यालयामार्फत आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे निकाल यावेळी जाहीर करण्यात आले. महाविद्यालयीन तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेते विद्यार्थी- प्रथम – अंजली संजय माळी (संत मुक्ताबाई कॉलेज मुक्ताईनगर), द्वितीय – मयुरी विकास चिमकर व तृतीय – कल्याणी संजय अहिरे (श्रीमती जी जी खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर) तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील अनुक्रमे विद्यार्थी विजेते – प्रथम – दिक्षा विजय पाटील (नवीन माध्यमिक विद्यालय सुकळी), द्वितीय अनिकेत देविदास बोदडे ( संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय मुक्ताईनगर) आणि तृतीय – भावेश संजय ठाकूर (जे. ई. स्कूल मुक्ताईनगर).
निबंध स्पर्धेतील पारितोषिक विजेते विद्यार्थी- प्रथम- महिमा राजेंद्र पाटील (संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय मुक्ताईनगर), द्वितीय – विवेक विनोद पाटील (घाटे विद्यालय उचंदा) आणि तृतीय सानिका विलास बराटे (जे. ई. स्कूल मुक्ताईनगर).
चित्रकला स्पर्धेतील पारितोषिक विजेते विद्यार्थी- प्रथम – अंजली धनराज पाटील (घाटे विद्यालय उचंदा), द्वितीय- किर्तिका जितेंद्र चौधरी (पिंपरी नांदू हायस्कूल पिंपरी नांदू) आणि तृतीय -अक्षदा अविनाश कसगोडे एफ.एम. तराळ हायस्कूल अंतुर्ली). या सर्व सहभागी आणि पारितोषिकप्राप्त विजेत्या विद्यार्थ्यांचे तहसील कार्यालय मुक्ताईनगरच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. कु. कल्याणी हिरे हिने विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. विविध स्पर्धा आणि कार्यक्रम यशस्वीतेसाठी खडसे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल पाटील, प्रा . डॉ. दीपक बावस्कर, प्रा. डॉ. छाया ठिंगळे, प्रा, डॉ,प्रतिभा ढाके, प्रा. विजय डांगे तसेच संत मुक्ताबाई महाविद्यालयातील प्रा. गायकवाड, प्रा. डॉ. संदीप माळी प्रा.डॉ.रमेश शेवाळे तसेच विविध शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षक याचबरोबर महसूल सहाय्यक राजेंद्र वानखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांनी, सूत्रसंचालन एन एस एस अधिकारी प्रा. विजय डांगे तर आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. संजीव साळवे यांनी केले. या कार्यक्रमाला मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थी, शिक्षक व नागरिक बहुसंख्येने ऑनलाइन उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा