भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

शिस्तभंग प्रकरणी मुक्ताईनगर पं. स. विस्तार अधिकारी व ग्रामसेवक निलंबित,कामकाजात अनियमितता व हलगर्जीपणाचा ठपका

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर,ता.मुक्ताईनगर, प्रतिनिधी। प्रशासकीय कामकाजात गैरवर्तन, अनियमितता आणि सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून पदभार असतांना परस्पर आदेश पारित करून शिस्तभंग केल्याप्रकरणी येथील पंचायत समिती ग्राम पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी राजकुमार जैन यांना तसेच कुन्हा येथील ग्रामसेवक विनायक पाटील या दोघांना गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी आदेशद्वारे निलंबित केल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ उडालेली आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. आर. नागटीळक यांनी सोमवारी दुपारी निलंबनाचे आदेश काढले आहे. निलंबन काळात राजकुमार जैन यांचे मुख्यालयात पंचायत समिती मुक्ताईनगर येथेच रहाण्याचे आदेश देण्यात आले आहे.

राजकुमार जैन हे येथील पंचायत समितीत विस्तार अधिकारी (ग्राप) यापदावर कार्यरत असतांना प्रशासकीय कामकाजात गैरवर्तवणुक, कामकाजात अनियमितता तसेच कार्यालयीन कामकाजात हलगर्जीपणा केल्यामुळे प्रशासकीय कामकाजास अडचण निर्माण केली असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच त्याच्याकडे सहाय्यक गटविकास अधिकारी पदाचा पदभार असतांना त्यांनी परस्पर आदेश पारित करून सेवा शर्तीचे उल्लंघन केले. तसेच पं.स. अंतर्गत विविध योजनांवर नियंत्रण अधिकारी म्हणून आपली जवाबदारी योग्यपणे पार पाडली नाही असा ठपका त्यांच्या निलंबन आदेशात ठेवण्यात आला आहे.तत्पुर्वी जैन यांची खाते चौकशी झाली. त्यात विविध नोंदी घेण्यात येऊन अहवाल जि. प. प्रशासनाकडे पाठविण्यात आला होता.

चौकशी अहवालावरून जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. प.) दिगंबर लोखंडे यांनी हे आदेश पारित केले. हे आदेश येथे प्राप्त होताच खळबळ उडाली आहे. सोमवारी ३१ रोजी गटविकास अधिकारी नागटीळक यांनी जैन यांच्या निलंबनाचे आदेश दिले. या निलंबन कारवाई मुळे खळबळ उडाली आहे. वडोदा ग्रामपंचायतीच्या ग्राम विस्तार अधिकाऱ्याने कोरोना बाधित सुटीवर असतांना ई टेंडर काढल्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई ची टांगती तलवार असल्याची चर्चा असतांना आज ग्राप विस्तार अधिकारी यांची विकेट पडली आहे.

चांगदेव ग्रामसेवकावर तक्रारी प्रकरणात अशी तत्परता दाखवत कारवाई होणार का नागरिकांचे लागले लक्ष

याच प्रमाणे चांगदेव येथील ग्रामसेवक रामकृष्ण चौधरी यांच्या विरोधात वेळोवेळी तक्रार अर्ज करून सुद्धा गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही तसेच तालुक्यातील इतर ग्रामसेवकांचे सुद्धा भरपूर प्रमाणात तक्रारी आहेत माहिती अधिकार दाखल केला असता माहिती उपलब्ध नाही अवलोकन ना साठी असल्याचे असे उडवाउडवीचे उत्तरे दिले जातात त्यावर अपील केले असता गटविकास अधिकारी तसेच विस्तार अधिकारी हे सुद्धा सदर ग्रामसेवकांना पाठीशी घालत असतात त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून कारवाई झाल्यामुळे गैरव्यवहारांना चाप बसेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!