पत्रकार संरक्षण समितीच्या मुक्ताईनगर तालुकाध्यक्षपदी अक्षय काठोके व उपाध्यक्षपदी अमोल वैद्य यांची निवड !
मुक्ताईनगर प्रतिनिधी : मुक्ताईनगर तालुका पत्रकार संरक्षण समिती कार्यकारिणी आज घोषित करण्यात आली असून मुक्ताईनगर तालुकाध्यक्षपदी अल्पावधीतच पत्रकारिते आपल्या लेखणी ठसा उमटवणारे अक्षय काठोके यांची निवड करण्यात आला असून उपाध्यक्षपदी अमोल वैद्य यांची निवड करणात आली तसेच मुक्ताईनगर शहराची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
अधिक वृत्त असे की, पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या आदेशानुसार आज जळगाव जिल्हाध्यक्ष आत्माराम गायकवाड यांनी मुक्ताईनगर येथील पत्रकार संरक्षण समितीची कार्यकारणी जाहिर केली. त्यात मुक्ताईनगर तालुका अध्यक्षपदी अक्षय काठोके यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून जळगाव जिल्हाध्यक्ष आत्माराम गायकवाड यांनी यावेळी निवडी संदर्भातील नियुक्ती पत्र दिले तसेच मुक्ताईनगर तालुका उपाध्यक्षपदी अमोल वैद्य, सचिव पंकज तायडे, कार्याध्यक्ष विठ्ठल धनगर, प्रसिद्धी प्रमुख आतिक खान, मुक्ताईनगर शहराध्यक्ष पंकज कपले, उपाध्यक्ष गणेश महाजन, सदस्य मंगेश ढोले, सदस्य सतिश गायकवाड, सदस्य अक्षय पालवे यांची निवड करण्यात आली यावेळी ज्येष्ठ पत्रकार संतोष कोसोदे, Tv9 मराठीचे प्रतिनिधी रवी गोरे उपस्थित होते. नवनिर्वाचित तालुका कार्यकारिणीत पत्रकारांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.