भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

भयंकर ! मुक्ताईनगर खुनाने हादरले : शालकाच्या डोक्यात कुर्‍हाडीचा वार : संशयित मेहुणा पसार

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

मुक्ताईनगर, प्रतिनिधी : येथील एका युवकाने आपल्या सासुरवाडीला जाऊन रात्री झोपेत असतांना शालकाच्या डोक्यात कुर्‍हाडीने जोरदार घाव घालत त्याचा खून केल्याची भयंकर घटना आज पहाटे उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मेहुण्यानेच शालकाची कुर्‍हाडीने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून यावल तालुक्यातील चुंचाळे येथिल मेहुण्या विजय सावकारे यांच्याशी विशाल वामन ठोसरे रा. शहरातील भुसावळ रोडवरील कोर्टापरिसर त्याच्या बहिणीचे सुमारे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. यानंतर मध्यतरी त्यांचे कौटुंबिक वाद उफाळून आले होते, मात्र नंतर सर्व ठीक होते विजय सावकारे हा काल रात्री सासूरवाडीला मुक्कामी आला येथे त्याने गोंधळ घातला. मात्र हा वाद मिटल्यानंतर विशाल ठोसरे हे आपल्या कुटुंबियांसोबत झोपले होते. दरम्यान, आज पहाट विशाल ठोसरे यांच्या आईला जाग आली असता त्यांना आपल्या मुलाच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घातले असून यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसून आल्याने कुटुंबियांना धक्का बसला याच वेळी विजय सावकारे हे घरात आढळून न आल्याने कुर्‍हाडीने वार करुन त्याची विशालच्या मेव्हण्यानेच केल्याचा संशय आहे. खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. शेवटचे वृत्त आले तोवर या प्रकरणी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून संशयित मेहुणा विजय सावकारे घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!