मुक्ताईनगर प्रभारी नगराध्यक्षाचा राजकीय द्वेशापोटी सर्वसाधारण सभा न घेता विकास कामांना खोळंबा– शिवसेनेच्या नगरसेवकांचा आरोप
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि : मुक्ताईनगर नगरपंचायत अंतर्गत शहरात अनेक कोटी रुपयांची विकास कामे मंजूर असून राजकीय आकसापोटी सर्व साधारण सभेचे आयोजन न करता मनमानी कारभार करणाऱ्या प्रभारी नगराध्यक्ष याचेवर कारवाई होऊन जिल्हाधिकारी विशेष अधिकार वापरून पिठासीन अधिकाऱ्यांची नेमणूक करून विशेष सभा घ्यावी अशा मागणीचे निवेदन देवून नगरसेवकांनी मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रागृहावर आयोजित पत्रकार परिषदेत प्रभारी नगराध्यक्ष राजकीय द्वेशापोटी सर्वसाधारण सभा न घेता शहरातील नागरी समस्यांना बगल देत असल्याचा आरोप केला.
नगरसेवकांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना दिलेल्या पत्रात आणि पत्रकार परिषदेत सांगितले की, मुक्ताईनगर नगरपंचायत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने राज्याचे मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. एकनाथजी शिंदे यांनी मुक्ताईनगर शहर अंतर्गत करोडो रुपयांचा निधी रस्ते, गटारी, विविध समजासाठी सामाजिक सभागृहे आदींसाठी दिलेला असून सदरील विकास कामांना खोळंबा व्हावा म्हणून या विकास कामांचे प्रशाकीय पत्रे (GR) प्राप्त झाल्यानंतरही प्रभारी नगराध्यक्ष असलेल्या उपनगराध्यक्षा मनीषा पाटील या कोणीतरी राजकीय व्यक्तीच्या इशाऱ्याने सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करीत नसून या विकास कामांना मुद्दाम आडकाठी आणण्याचा हा संताप जनक प्रकार असून दि. 1 जून 2022 च्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते यानंतर वारंवार तक्रारी निवेदने देवूनही सदरील प्रभारी नगराध्यक्ष सर्व साधारण सभा काढलीच नाही.
यानंतर दि. 17 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांनी सर्वसाधारण बैठक आयोजित केलेली होती. या बैठक अजेंड्यात आमचे प्रभागातील एकही विकास काम घेतलेले नव्हते त्यामुळे आम्ही त्यांना लेखी पत्र देवून त्यांचे घेतलेले विषय पुढच्या सर्वाधारण अजेंड्यावर घेतांना शहरातील सर्व प्रभागातील विषय आणि विकास कामे मंजूर झालेले प्रशासकीय विषय घेण्याची मागणी करून लेखी कळविले होते परंतु अद्याप पावेतो त्यांनी सर्वसाधारण बैठकीचा अजेंडा काढलेला नाही. त्यामुळे नगरपालिका अधिनियम 1965 नुसार दर दोन महिन्यांनी सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक असतांना राजकीय सुडापोटी बोलविता धनी यांचे इशाऱ्यावरून सर्व साधारण बैठकीचे आयोजन करीत नसून यासंदर्भात म. जिल्हाधिकारी जळगाव यांना दि. 13.10.2022 रोजी लेखी पत्र देवून जर स्थानिक पातळीवर नगराध्यक्ष राजकारण करून पालिका सदस्यांचे विषय न घेता बैठक घेत असेल तर नगरपालिका अधिनियम 1965 च्या कलम 81 नुसार सदस्यांच्या मागणीनुसार पीठासीन अधिकारी यांची नियुक्ती करून विशेष सभा घेण्याची मागणी केलेली आहे.
परंतु म. जिल्हाधिकारी मो यांनी देखील अद्यापपावेतो बैठकीचे आयोजन केलेले नाही. त्यामुळे येत्या 8 दिवसात सर्वसाधारण बैठकीचे आयोजन न करणाऱ्या प्रभारी नगराध्यक्ष यांचे वर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी व म. जिल्हाधिकारी जळगाव यांनी तर नगरपालिका अधिनियम 1965 च्या कलम 81 नुसार सदस्यांच्या मागणीनुसार पीठासीन अधिकारी यांची नियुक्ती करून विशेष सभा घ्यावी यासाठी स्मरण पत्र देवून जनहितासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत राजेंद्र सुकदेव हिवराळे, (गटनेता, नगरसेवक प्रभाग क्र. 17. मुक्ताईनगर), निलेश प्रभाकर शिरसाट, (गटनेता, नगरसेवक प्रभाग क्र. 15, मुक्ताईनगर), पियुष भागवत मोरे (गटनेता, नगरसेवक प्रभाग क्र. 7. मुक्ताईनगर) ,संतोष प्रल्हाद कोळी (उपगटनेता, नगरसेवक प्रभाग क्र. 1. मुक्ताईनगर), मुकेशचंद्र कैलास वानखेडे (नगरसेवक प्रभाग क्र.6, मुक्ताईनगर), संतोष सुपडू मराठे, (उपगटनेता, नगरसेवक प्रभाग क्र. 12, मुक्ताईनगर) , श्रीमती शबाना बी अब्दुल आरिफ, (नगरसेवक प्रभाग क्र.2, मुक्ताईनगर), श्रीमती नुसरत बी महेबूब खान, (नगरसेवक प्रभाग क्र.3. मुक्ताईनगर) ,श्रीमती सविता सुभाष भलभले, (नगरसेवक प्रभाग क्र.14. मुक्ताईनगर) आदींची उपस्थिती होती.