जीवनावश्यक वस्तुंच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन
मंडे टू मंडे वृत्तसंकलन
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे वृत्तसेवा। देशातील पेट्रोल डिझेल गॅस खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तुं च्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रातुन केंद्र सरकारच्या विरोधात २० ऑक्टोंबर २०२१ रोजी आंदोलन करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून मुक्ताईनगर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पंचायत समिती सभापती विकास समाधान पाटील, कृ. उ. बा. स. सभापती निवृत्ती पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.
मुक्ताईनगर तालुक्यातील व शहरातील सर्व राष्ट्रवादी युवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत राहून मुक्ताईनगर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी, तालुकाध्यक्ष शाहिद खान, कार्याध्यक्ष राजेश पाटील ढोले, जि. सरचिटणीस प्रवीण दामोदरे, जि. संघटक उद्धव महाजन, vjnt तालुकाध्यक्ष नितेश राठोड, तालुका सरचिटणीस जितेंद्र तायडे, तालुका संघटक विनोद चव्हाण, तालुका चिटणीस प्रदीप पाटील, सोशल मीडिया तालुका उपाध्यक्ष भूषण धनगर, तालुका कोषाध्यक्ष रवी सुरवाडे, अजय तळेले, विनय पाटील, राहुल पाटील, ललित पाटील, बंटी पाटील, संदीप लिंगे, सागर पाटील, शालिग्राम कांडेलकर, महेंद्र कांडेलकर, सुधाकर मेळे, कांतीलाल चव्हाण, आदी उपस्थीत होते..!!!