राज्यपाल कोशारी आणि त्रिवेदी यांचा मुक्ताईनगर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निषेध
मुक्ताईनगर – मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी | भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचा मुक्ताईनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे निषेध करण्यात आला. भगतसिंग कोश्यारी यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करण्यात यावी या मागणीचे मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमुद करण्यात आले की, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारत देशाचे आराध्य दैवत असुन जोपर्यंत चंद्र सुर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण भारत वासीयांच्या हृदयात अढळ स्थान आहे. परंतु महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. वारंवार समाजात तेढ निर्माण करून शांतता भंग करणाऱ्या भगतसिंग कोश्यारी सारख्या व्यक्तीला राज्याच्या राज्यपाल पदावर राहण्याचा हक्क नाही अशा समाजविघातक विचारसरणीच्या भगतसिंग कोशारी यांची त्वरित महाराष्ट्र राज्यातून हकालपट्टी करण्यात यावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी वतीने मागणी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर,जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे,तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर,राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष पवनराजे पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र माळी, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे,तालुका सरचिटणीस रविंद्र दांडगे, नंदकिशोर हिरोळे,रामभाऊ पाटील,विजय पाटील,विशाल रोठे,मुन्ना बोडे, रउफ खान,शाहिद खान,जुबेर अली, आसिफ पेंटर, फिरोज शेख, मुश्ताक मण्यार, सली मिस्त्री, अनिस पटेल, अय्याज पटेल, हाशम शाह, वहाब खान, हारून कुरेशी, इरफान खान, आबीद शे मजिद, कौसर अली, चेतन राजपूत,रजाक मुलतानी,योगेश पाटील, रितेश पाटील, मयुर पाटील,अजय आढायके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.