राष्ट्रवादी सोशल मीडिया जिल्हाध्यक्षाना जीवे मारण्याची धमकी : पोलिसांत तक्रार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सोशियल मिडिया सेलचे जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील यांनी त्यांना तिन लोकांनी फोन करून जिवे मारण्याची धमकी दिल्या बद्दल मुक्ताईनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि मुक्ताईनगर येथील शिवराज पाटील हे जळगाव जिल्हा राष्ट्रवादी सोशियल मीडिया सेलच्या जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत दि 2 ऑक्टोबर रोजी जामनेरचे भाजप आमदार गिरीष महाजन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असे म्हंटले होते की, मुक्ताईनगरचे आमचे आमदार चंद्रकांत पाटील या वाक्याला अनुसरून शिवराज पाटील यांनी २/१०/२०२१ रोजी १.५० मिनिटला त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून गिरीशभाऊ म्हणता मुक्ताईनगरचे आमदार आमचे म्हणजे भाजपाचे एकूण १०७ समजायचे का आता…… ? अश्या आशयाची पोस्ट अपलोड केली होती
त्यावर दि. २/१०/२०२१ रोजी रात्री ८ वा. ८ मिनिटांनी
प्रकाश गोसावी रा.मुक्ताईनगर, मितेश पाटील रा.शेमळदा, अक्षय पाटील रा.वरणगांव याने वरून शिवराज पाटील यांना कॉल करून शिवसेना स्टाईल ने जिवंत ठार मारण्याची धमकी दिली. तसेच चंदुभाऊ साठी रक्त देऊ शकतो तसे घेऊ शकतो. तसेच या पोस्टवर “बाळकडू देल्या शिवाय जमणार नाही”. अशी कॉमेंट करून लेखी स्वरुपात धमकी दिली आहे. तसेच तुम्ही अश्या स्वरूपाच्या पोस्ट करणे सुद्धा बंद करा, नाहीतर तुम्हाला कळेलच काय होईल ते. तसेच ४०ते ५०+ अनोळखी लोक शिवराज पाटील यांना सतत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत निंबा पाटील यांचे नाव घेऊन जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत. तरी माझे अथवा माझ्या परिवारातील सदस्यांच्या जीवाचे काही एक बरे वाईट झाल्यास वरील व्यक्ती व त्यांचे ४०-५० समर्थक लोक जबाबदार राहतील व त्यांनाच जबाबदार धरण्यात यावे. असे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे
तसेच वरील लोक हे सतत शिवराज पाटील यांच्या घराकडून मोटर सायकलींवर ट्रिपल सीट बसून येऊन जोर-जोरात होर्न वाजवून शिवराज पाटील यांना घाबरवत असतात. त्यामुळे शिवराज पाटील आणि त्यांच्या परिवाराच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तरी प्रकाश गोसावी, मितेश पाटील, अक्षय पाटील यांच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून मला पोलीस संरक्षण देण्यात यावे असे शिवराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे त्यांनी या आशयाची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक यांचेकडे सुद्धा लेखी तक्रार केली आहे